अन्न धान्यासोबतच व्यापारी व नगदी पिकाचे
क्षेत्र वाढविणे,
या पिकासाठी शेतकर्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय अन्न
सुरक्षा अभियान (व्यापारी पिके) अंतर्गत कापूस विकास कार्यक्रम राबविला जातो. या
पिकासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच या पिकाखालील क्षेत्र वाढविणे
त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आदी उपक्रम या योजनेंतर्गत घेतले जातात.
योजनेची व्याप्ती : १२ व्या पंचवार्षिक
योजनेत अन्न धान्याच्या गरजेसोबत नगदी पिकाची गरज भागविण्यासाठी कापूस पिकाअंतर्गत
अन्नधान्य पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे. या अंतर्गत आंतरपीक पद्धतीस
प्रोत्साहन देणे तसेच अतिघन लागवडीची प्रात्यक्षिक आयोजित करणे, कडधान्य
पिकाच्या क्षेत्र विस्तार व सुधारित तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढविण्याच्या
उद्दिष्टाने जिल्ह्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी उत्पादकता असलेल्या
तालुक्यामध्ये कार्यक्रम राबविणे, तालुक्यातील प्रकल्प
क्षेत्र निवड करून त्या तालुक्यातील सर्वात कमी उत्पादकता असलेल्या मंडळाची निवड
करणे, त्यात गावाची व प्रकल्प क्षेत्राची निवड करून प्रकल्प
क्षेत्राची निवड करून प्रकल्प राबविणे आदी कार्यक्रम या योजनेंतर्गत घेतले जातात.
लाभार्थी निवडीचे निकष, नियम,
अटी : प्रकल्प क्षेत्रातील नोंदणीकृत शेतकरी गट, उत्पादक
कंपन्यांची निवड ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली जाते. लाभार्थीची निवड
ग्रामपंचायतीच्या सहभागाने व समन्वयाने करावी लागते. जिल्ह्यातील अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती, महिला, अल्प
व अत्यल्प भूधारक, अपंग शेतकर्यांची प्राधान्याने निवड
करण्यात येते. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त 0.४0 हेक्टरपर्यंत लाभ दिला जातो.
योजनेचे स्वरूप : कापूस पिकात तूर, उडीद,
मूग यासारख्या अन्नधान्याच्या आंतरपिकास प्रोत्साहन देणे. कापूस
पिकात एकात्मिक किड व्यवस्थापन, कापसाच्या देशी वाणाची अतिघन
लागवड, अधिक लांब धाग्याच्या कापसाची प्रात्यक्षिके आयोजित
करून कापूस उत्पादनास चालना देणे हा योजनेचा उद्देश आहे.
लाभाचे स्वरूप : प्रात्यक्षिकासाठी बियाणे
व निविष्ठा किट कृषी खात्याच्या मार्गदर्शक सूचनेनुसार (प्रकल्प आधारित) उपलब्ध
करून दिले जाते. एकात्मिक किड व्यवस्थापना अंतर्गत किटनाशकांच्या पुरवठा केला
जातो.
अर्ज व अर्जाचे नमुने : संबंधित शेतकरी लाभार्थ्यास योजनेच्या लाभासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. तेथेच अर्जाचे नमुने मिळतात.
संपर्क व अधिक माहिती : संबंधित कृषी सहायक, कृषी
पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका
कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात योजनेची
अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.
संबंधित अधिकारी : जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी, यवतमाळ