Sunday, November 27, 2016

ओलितासाठी सूक्ष्म सिंचन योजना


        
   
         पारंपरीक ओलिताच्या पध्दतीमुळे पाण्याचा अपव्यय होतो. शिवार पाण्याची उपलब्धता पाहता ही पध्दत चुकीची आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्यासोबतच आधुनिक साधनांद्वारे सिंचन करण्यासाठी विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सुक्ष्म सिंचन योजना राबविली जाते. योजनेंतर्गत अनुदानावर तुषार व ठिबक सिंचन संच उपलब्ध करून दिले जाते.

योजनेची व्याप्ती :
विदर्भातील अमरावती व नागपूर विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाते.

योजनेचे स्वरूप :
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे कृषी उत्पादन आणि पयार्याने शेतक?्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करणे, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत कृषी व फलोत्पादनचा विकास करण्यासाठी सुक्ष्म सिंचन पध्दती विकसीत करणे.

लाभार्थी निकडीचे निकष :
योजनेच्या लाभासाठी शेतकर्‍याच्या नावे मालकी हक्काचा सातबारा व आठ-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. सबंधित शेतकर्‍याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी. सामूहिक सिंचनाची उपलब्धता असल्यास शेतकर्‍याचे घोषणापत्र असणे आवश्यक आहे. ज्या पिकाकरीता संच बसविण्यात येणार आहे त्या पिकांची नोंद सातबारा उतार्‍यावर क्षेत्रासह असावी. विद्युत पंपाकरीता कायमस्वरूपी विद्युत जोडणी असावी. सुक्ष्म सिंचन बसवावयाच्या सर्वे नंबरचा चतुर्सिमा नकाशा सोबत असाव्या, लाभार्थी शेतकर्‍याने यापूर्वी केंद्र पुरस्कृत येाजनेंतर्गत सुक्ष्म सिंचनासाठी लाभ घेतला नसल्याचे किंवा घेतला असल्यास कोणत्या वर्षासाठी किती क्षेत्रासाठी लाभ घेतला यांचे मंडळ कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पाणी व मृद तपासणी अहवाल, यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी मागील दहा वर्षात ठिंबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे, असे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. ठिंबक व तुषार सिंचन संचाकरीता इतर कोणत्याही केंद्र व राज्य योजनेंतर्गत यापूर्वी अनुदान उपलब्ध करून घेतले असल्यास या योजनेंतर्गत त्याच संचाकरीता लाभ घेता येणार नाही.

लाभाचे स्वरूप :
सदर सुक्ष्म सिंचन योजना शंभर टक्के पुरस्कृत योजना आहे. योजनेंतर्गत ठिंबक सिंचन पध्दतीकरीता दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. अल्प, अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांना एकूण किमतीच्या ७५ टक्के किंवा रुपए ५७ हजारपयर्ंत अनुदान दिले जाते. इतर शेतकर्‍यांना एकूण किमतीच्या ५0 टक्के किंवा रूपये ३८ हजारांपर्यंत अनुदान दिले जाते. तुषार सिंचन पध्दतीकरीता दोन हेक्टर क्षेत्राकरीता एकाच संचासाठी अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी अल्प, अत्यल्प भुधारकांना एकूण किमतीच्या ७५ टक्के किंवा रुपए २२ हजार इतके अर्थसहाय्य दिले जाते. इतर शेतकर्‍यांना एकूण किमतीच्या ५0 टक्के किंवा रुपए १५ हजारांपर्यंत अनुदान दिले जाते. सन २0१४-१५ पासून अर्थसहाय्याची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात येते.

अर्ज कोठे करावा :
व्यवस्थित संपूर्ण भरलेला अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावा लागतो. याच प्रणालीवर आनलाईन अर्ज उपलब्ध आहे.

संपर्क व अधिक माहिती :
संबंधीत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात योजनेची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.

संबंधित अधिकारी :
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी