Tuesday, December 13, 2016

अभियानाचे चेतना दुत-रमेश शेंडे यांनी ठेवला समाजासमोर आदर्श


अभियानास ५० हजारांची मदतः जिल्‍हाधिकारी सिंह यांनी केला सन्‍मान 
कुटुंबातील वडील व पत्‍नी कर्करोगाने गमावले. अशी स्थिती जिल्‍हयातील इतर शेतक-यांवर येऊ नये. त्‍यांचा वेळीच उपचार व्‍हावा. यासाठी आपल्‍याकडूनही फुल ना फुलाची पाकळी म्‍हणून रमेश मारोतराव शेंडे यांनी पत्‍नीच्‍या तेरवीला लागणा-या खर्चाची ५० हजार रूपयांची रक्‍कम पत्‍नी विजया शेंडे हिच्‍या जन्‍म दिवशी बळीराजा चेतना अभियान समितीस प्रदान करून समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवले.गुरूवार दि. ८ डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍याकडे ५० हजार रूपयांचा धनादेश त्‍यांनी सूपुर्त केला. यावेळीपरविक्षाधीन जिल्‍हाधिकारी दीपक मीणा, अपर जिल्‍हाधिकारी लक्ष्‍मण राऊत, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले जिल्‍हाधिकारी यांनी बळीराजा चेतना अभियानाचे स्‍मृती चिन्‍ह देऊन त्‍यांचा सन्‍मानही केला.
      यवतमाळ शहरातील देवानंद नगरातील रहिवासी सेवा निवृत्‍त सहायक निबंधक(सहकारी संस्‍था ) रमेश मारोतराव शेंडे यांची पत्‍नी विजया यांचे ५ ऑगस्‍ट २०१६ रोजी कर्करोगाने निधन झाले. यावेळी त्‍यांनी तेरवीचा कार्यक्रम न करता याचा खर्च सामाजिक कार्यात खर्च करावा असा त्‍यांचा मनोदय होता. अशातच बळीराजा चेतना अभियान समितीकडून जिल्‍हयातील कर्क रोगग्रस्‍त शेतक-यांना मदत वितरीत करीत असल्‍याची माहिती त्‍यांना मिळाली.  त्‍यामुळे रमेश शेंडे यांनी तेरवी कार्यक्रम न करता यावर होणारा ५० हजार रूपयांचा खर्च हा कर्करोग ग्रस्‍तांच्‍या उपचाराच्‍या मदतीसाठी देण्‍याचे ठरविले. ८ डिसेंबर रोजी त्‍यांची जीवनसंगीनी विजया यांचा जन्‍म दिवस असल्‍याने या दिवसाचे औचित्‍य  साधून ही रक्‍कम जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांना सुपूर्त करून समाजासमोर एक आदर्शच उभा केला.

अवास्‍तव खर्च टाळून मदत करावी
समाजातील अनेक नागरिक विवाह, वाढदिवस, तेरवीअशा विविध क्षणिक सुखाच्‍या कार्यक्रमावर अवास्‍तव केला जातो. मात्र, हा खर्च जिल्‍हयातील गरजवंत, निकडवंत शेतक-यांच्‍या उपचारासाठी, त्‍यांच्‍या पाल्‍यांच्‍या शिक्षणसाठी दिल्‍यास समाज आपल्‍या पाठीशी उभा असल्‍याची भावणा निर्माण होईल. यातून एक प्रकारे सामाजिक बांधीलकी जोपसता येईल. त्‍यामुळे समाजातील अशा दानशूर व्‍यक्‍तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

समाजातील नागरिकांनी पुढे यावे
जिल्‍हयातील शेतकरी संकटात सापडला असताना जिल्‍हयातील दानशूर नागरिकांनी पुढे येऊन शेतक-यांचे मनोधैर्य वाढविले पाहिजे, त्‍यांना मदत केली पाहिजे. आल्‍याकडील  कौटुबिंक कार्यक्रमावर अवास्‍तव खर्च न करता मदत केली पाहिजे.

रमेश मारोतराव शेंडे, यवतमाळ