१.
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)
मोबाइलमधून मेसेज
पाठविण्याइतकेच हे सोपे आहे. प्रत्येक बँकेचे स्वतःचे मोबाइल अॅप आहेच. त्यामुळे
आता आपल्या स्मार्ट फोन वरून व्यवहार करणे शक्य आहे.
कसे ते
पाहा:
- तुमच्या बँकेत किंवा
एटीएममध्ये मोबाइल क्रमांक रजिस्टर करा
- मोबाइल वर 'UPI'अॅप डाउनलोड करा
- तुमचा युनिक आयडी तयार
करा
- UPI पिन सेट करा
फायदे:
- कोणत्याही दोन व्यक्तींना
कोणत्याही ठिकाणावरून खरेदी-विक्री व्यवहार करणे सोपे होणार
- आर्थिक व्यवहारासाठी आधी
लाभार्थी जोडण्याची गरज नाही.
२.
ई-वॉलेट
तुमच्या मोबाइलमधून
फोटो पाठवणे जितके सोपे तितकेच हे देखील सोपे. ई-वॉलेटद्वारे तुमच्या मोबाइल वा
कंप्युटरमधून पैशांचे व्यवहार करणे शक्य आहेत.
कसे ते
पाहा:
- आपल्या सोयीसाठी एक
ई-वॉलेट सेवा निवडा आणि त्याचे अॅप डाउनलोड करा
- तुमचा मोबाइल क्रमांक
रजिस्टर करा
- या अॅपमधून डेबिट कार्ड,
क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगशी जोडले जा.
फायदे:
- बँकाद्वारे खासगी सेवा
पुरविणाऱ्या वॉलेट कंपन्या आणि टेलिफोन कंपन्या सुद्धा... असे अनेक पर्याय उपलब्ध
आहेत.
- ई-वॉलेट सेवा देणाऱ्या
अनेक कंपन्या तर ग्राहकांना रिचार्ज निवडीचे अनेक पर्यायही देतात.
३.
कार्ड्स, पीओएस
शहरी भागात हे अगदी
सामान्य आहे. POS म्हणजे 'पॉइंट ऑफ सेल' म्हणजेच 'विक्रीचे
ठिकाण'. आपले डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून
पेमेंट्स करण्याची ही सुविधा आहे.
कसे ते
पाहा:
- आपले बँक खाते असलेल्या
बँकेतून 'डेबिट कार्ड' मिळवा किंवा
क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा.
- पिन सेट करा आणि लक्षातही
ठेवा
- तुमचे कार्ड स्वाइप करा,
जी रक्कम भरायची आहे ती टाइप करा. आपल्या PIN टाकून
भरा.
फायदे:
- बँक खाते उघडल्यानंतर
आपोआप डेबिट कार्ड मिळूनच जाते.
- ते कार्ड पैसे
काढण्यासाठी आणि भरण्यासाठीही जगभरातील कोणत्याही एटीएममध्ये वापरता येते.
- ऑनलाइन व्यवहारासाठीही
कार्ड वापरले जाऊ शकते
४. आधार
सक्षम पेमेंट सिस्टीम (AEPS)
- आधार कार्डद्वारे बँकिंग
करू शकत असाल तर मग आपल्या बँकेवर अवलंबून का राहता? आता
आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्या.
कसे ते
पाहा:
- तुमचे आधार कार्ड तुमच्या
बँक खात्याशी जोडून घ्या.
- तुमचा आधार नंबर लक्षात
ठेवा किंवा त्याची एक प्रत स्वतःजवळ बाळगा
- एका पेक्षा अधिक बँक खाती
असल्यास आधार कार्डशी जोडलेल्या बँकेचे खाते कोणते ते नीट लक्षात ठेवा
- आधार बायोमेट्रिक्ससाठी
रेकॉर्ड केले गेलेले तुमचे फिंगरप्रिंट खरेदी-विक्री व्यवहारात ग्राह्य धरले
जातात.
फायदे:
- बाकी रकमेची (बॅलन्स)
चौकशी, कॅश काढणे, भरणे आणि आधार
कार्ड-ते-आधार कार्ड फंड ट्रान्सफर सोपे
- अधिकची नोंदणी गरजेची
नाही.
- ग्रामीण भागात ही सुविधा
उपयोगी पडू शकते, जिथे बँकिंग प्रतिनिधींद्वारे व्यवहार केले
जातात.
५.
अविस्तृत पूरक सेवा माहिती (यूएसएसडी)
- या प्रणालीद्वारे
कोणत्याही मोबाइल फोनच्या इंटरफेसमधून तुम्ही पैसे पाठवू शकता.
कसे ते
पाहा:
- तुमचा मोबाइल क्रमांक
तुमच्या बँक खात्याशी जोडा
- तुमच्या मोबाइलमधून *99# डायल करा.
- तुमच्या बँक शाखेच्या IFSC
कोडमधील पहिली तीन किंवा चार अक्षरे टाइप करून आपली बँक नेमकी ओळखा
- मेनूमध्ये झळकणाऱ्या पर्यायांपैकी,
'Fund Transfer-MMID'हा पर्याय निवडा
- प्राप्तकर्त्याचा मोबाइल
क्रमांक आणि MMID टाका.
- पैसे भरायचे आहेत ती
रक्कम आणि तुमचा MPIN टाका. त्यानंतर एक स्पेस देऊन तुमच्या
बँक खाते क्रमांकातील शेवटचे चार अंक टाका.
फायदे:
- स्मार्टफोनची आवश्यकता
नाही.
- मोबाइल इंटरनेट
कनेक्शनचीही आवश्यकता नाही