शेकरू(Shekru) शेतक-यांकरीता उपयुक्त Android App
शेकरू हे
स्मार्टफोन आधारित दुहेरी भाषायुक्त मोफत मोबाईल शेतक-यांकरीता
बनवले उपयुक्त मोबाइल अॅप्लीकेशन आहे. या
अॅप्लीकेशनमध्ये शेती क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम, योजना, ध्वनिफिती, कृषी शिक्षण,
कृषी कौशल्य विकास, आर्थिक स्त्रोत याबद्दल
माहिती दिली जाते. आणि यातील सर्व माहिती मराठी व इंग्रजी भाषेमध्ये प्रस्तुत केली
आहे.
शेकरूमध्ये कृषी सहकार्यासाठी विविध भागधारक, राज्य कृषी मंत्रालय इ. यांचे कृषी क्षेत्राशी निगडीत उपक्रम व योजना सूचीबद्ध आहेत. प्रत्येक योजनेची माहिती संक्षिप्त स्वरुपात प्रस्तुत केली आहे तसेच हि माहिती आपण ईमेल तथा शेअर करू शकता. योजनांमध्ये अनुदानापासून ते कर्ज स्वरुपात आर्थिक मदत, विमा सुविधा इ. बाबी समाविष्ट आहेत. वापरकर्त्यास विशिष्ट स्त्रोतापासून प्रकाशित नवीन किंवा सुधारित योजना सूचित केल्या जातात.
शेकरूच्या
ध्वनिफिती दालनातून कृषी क्षेत्राशी निगडीत विविध स्त्रोत यात प्रामुख्याने
प्रगतीशील शेतकरी, व्यावसायिक, शेतीतज्ञ, विचारवंत, संस्था,
कंपन्या, नोकरशाह, शासकीय
व अशासकीय संस्था, समुदाय रेडीओ, यांच्या
शेतीशी निगडीत विविध विषयांवर मार्गदर्शनपर ध्वनिफिती आपण डाउनलोड करून ऐकू शकता.
यात प्रामुख्याने मुलाखत, चर्चा, अहवाल
सादरीकरण, सल्ला, ज्ञान, कौशल्य, आपली मते, सेवा यांचा
समावेश आहे. यात वापरकर्ते विशिष्ट स्त्रोतानुसार ध्वनिफिती अनुसरण करू शकता तसेच
यात नवीन तथा सुधारित प्रकाशित ध्वनिफिती भाग सूचित केले जातात.
सदर मोबाइल अॅप मराठी आणि
इंग्रजी मध्ये गुगल प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे.