जिल्हयातील शेतक-यांना बळीराजा चेतना अभियानाची, विविध
पिकांची, शेतीविषयक चालू घडामोडी, नैसर्गिक
शेती, बाजारभाव, शेतकरी यशोगाथा, रोजगाराविषयी माहिती विविध शासकीय योजना यासह इतर शेतीविषयक उपयुक्त
माहिती www.balirajachetna.org या बळीराजा चेतना अभियानाच्या वतीने निर्माण करण्यात
आलेल्या संकेतस्थळावर मिळणार आहे.
ऑनलाइन तक्रारी दाखल करता येणार
शेतक-यांना बळीराजा चेतना अभियाना विषयी काही
तक्रारी असल्यास या संकेस्थळावर ऑनलाइन रित्या तक्रार दाखल करता येणार आहे.
तसेच शेतक-यांना काही सुचना असल्यास तेही देता येणार आहे. त्यामुळे शेतक-यांसाठी
हे संकेतस्थळ उपयुक्त ठरणार आहे.