१. विभागाचे नाव :
सहकार व पणन विभाग, महाराष्ट्र शासन
२. योजनेचे नाव :
कृषिसमृद्धी –
समन्वयीत कृषि विकास प्रकल्प
३. योजनेची व्याप्ती :
प्रकल्पांतर्गत निवड
करण्यात आलेल्या एकूण 461 गावातील निवड करण्यात आलेल्या लाभार्थीसोबत प्रकल्पांतर्गत घटकांची
अंमलबजावणी करणे.
४. लाभार्थी निवडीचे निकष, नियम व अटी :
अल्प व अत्यल्प
भूधारक (5 एकर खालील) शेतकरी, भूमिहीन, आत्महत्याग्रस्त कुटुंबे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील कुटुंबे.
५. आवश्यक कागदपत्रे :
प्रकल्पांतर्गत लाभ मिळविण्यासाठी कृषिसमृद्धी प्रकल्प कार्यालय, यवतमाळकडे अंमलबजावणी यंत्रणेच्या मार्फत खालील कागदपत्रे येथे सादर करणे अपेक्षित -
१. लाभार्थी
प्रमाणपत्र लाभार्थी क्रमांकासह
२. गटाचा ठराव व
मागणीपत्र (शिफारसपत्र)
३. खर्चाचे मुळ बिल /
कृ.उ.बा.स. खरेदी विक्री पावती
४. ७/१२ व ८ अ
५. शासनामार्फत
प्राप्त कोणतेही ओळखपत्र
६. विमापावती (पशु
आधारित उद्योगाकरिता)
७. प्रशासकीय व
ता.कृ.अ. यांची तांत्रिक मंजुरी (मृदा व जलसंधारण कामे)
८. ग्राम विकास समितीचे शिफारस पत्र
६. योजनेचे स्वरूप :
१. प्रशिक्षण (कृषी व कृषी आधारित उद्योग धंदे, कौशल्य आधारित
प्रशिक्षण)
२. अभ्यास दौरा,
२. पिक प्रात्यक्षिक,
४. मृदा व जलसंधारण (विहीर पुनर्भरण, शेततळे. सिमेंटनाला
बांध बांधणे, सिमेंटनाला बांधातील गाळ काढणे),
५. कृषी आधारीत उद्योग धंदे,
६. पशुआधारित उद्योग धंदे (दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन)
७. लाभाचे स्वरूप :
प्रकल्पांतर्गत
निर्धारित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे
१.प्रशिक्षण व
आभ्यास दौरे (१००%)
२. पिक प्रात्यक्षिक
– १००%
३.कृषि आधारित
उद्योग (३०% किंवा रु. १ लक्ष)
४.पशुआधारित उद्योग –
अ. दुग्धव्यवसाय
(२५% किंवा रु. २५ हजार)
ब. परसातील
कुक्कुटपालन (५०% किंवा रु.२.५0 हजार)
क. व्यावसायिक
कुक्कुटपालन (३०% किंवा १.५ लक्ष)
ड. शेळीपालन (३०%
किंवा रु. १८ हजार)
५. मृदा व जलसंधारण कामे – ९०%
८. अर्ज व अर्जाचे नमुने :
मुद्दा क्रमांक ५
प्रमाणे
९. संपर्क व अधिक माहिती :
कृषिसमृद्धी –
समन्वयीत कृषि विकास प्रकल्प,
पहिला माळा,
प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ –
फोन नंबर –
०७२३२-२३९४१६
email – dpmtyavatmal@gmail.com
१०. संबधित अधिकारी :
जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, कृषिसमृद्धी –
समन्वयीत कृषि विकास प्रकल्प, यवतमाळ