Tuesday, August 16, 2016

बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजार

यवतमाळ जिल्‍हाधिकारी कार्यालयात बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजार चे आयोजन


दि.७.०४.२०१६ रोजी पासून जिल्‍हाधिकारी कार्यालयातील परिसरात प्रत्‍येक शुक्रवारी सायं. ४.०० ते ७.०० या वेळेत शेतक-यांचा शेतमाल खरेदी विक्री बाजाराचे आयोजन करण्‍यात येते, या बाजारामध्‍ये शेतकरी आपल्‍या शेतातील पिकवलेला शेतमाल कार्यालय परीसरात विक्रीकरीता आणतात. यामधून शेतक-यांची आर्थीक उन्‍नती व्‍हावी, त्‍यांना जास्‍तीत-जास्‍त नफा मिळावा हा यामागचा उद्देश आहे.
यामध्‍ये फळे, भाजीपाला, कडधान्‍य इत्‍यादी प्रकारच्‍या मालाचा समावेश आहे. बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजारामध्‍ये शेतक-यांना त्‍यांचा माल थेट ग्राहकांना विकण्‍याची संधी प्राप्‍त होते. या ठिकाणी त्‍यांना हमाली, दलाली किंवा कोणत्‍याही प्रकारचे शुल्‍क आकारले जात नाही. बाजारामुळे शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात वाढ झाली असून कार्यालय परीसरात भाजीपाला विकल्‍यामुळे त्‍यांना ठोक विक्रीपेक्षा जास्‍तीचा नफा मिळतो, तसेच शासकीय कर्मचा-यांना व इतर नागरीकांना ताजा भाजीपाला मिळतो व त्‍यांचा बाजारात जाण्‍याचा वेळही वाचतो. या बाजारामुळे कर्मचारी, नागरीकांना व शेतक-यांनाही समाधान मिळत आहे. जिल्‍हाधिकारी कार्यालयाप्रमाणे जिल्‍हयातील इतरही सर्व शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, कॉलणी यामध्‍ये सुध्‍दा थेट शेतमाल विक्री बाजाराचे आयोजन केल्‍या जात आहे.

शेतक-यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील शेतमाल विक्री बाजारामध्‍ये सहभागी होण्‍याकरीता खालील क्रमांकावर संपर्क साधावा-
बळीराजा चेतना अभियान कक्ष- ०७२३२-२४४१०० (टोल फ्रि क्र.-१८०० २३३ ६३६०)