Tuesday, August 23, 2016

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

दारिद्र्य रेशे खालील आणि दारिद्र रेशे वरील अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा या करिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी (महाराष्ट्र सरकार उपक्रम) व नेशनल इंसुरंस का. लिमिटेड यांच्या तर्फे हि योजनाराबवली जात आहे. या योजने अंतर्गत शस्त्रक्रिया / औषधोपचार व फेरतापासणी उपचारांचा लाभ घेता येईल.

जिल्हयांमधील सर्व शेतकऱ्यांना शाश्वत आरोग्य सेवा देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबववण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतगगत दारिद्र्य रेषेखालील पिवळी, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा व दारिद्र्य रेषेवरील (रु. 1 लक्ष पयंत वार्षिक उत्पन्न असलेल्या) केशरी शिधापञिकाधारक कुटुांबांचा लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय क्रमांक – रागांयो-२०१५/प्र. क. २८०/आरोग्‍य-६  नुसार औरगाबाद, जालना, परभणी, हींगेाली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या 14 शेतकरी आत्महस्ताग्रस्त जिल्हयांतील सर्वच शेतकरी कुटुांबांचा लाभार्थी म्हणून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या 14 जिल्हयांतील शुभ्र शिधापञिकाधारक शेतकरी कुटुांबांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शिधापञिका तसेच 7/12 च्या उताऱ्यावर पुढील लाभ देण्‍यात येत आ‍हे. 




अधिक माहीती करीता- टोलफ्री क्र. -१८०० २३३ २२ ००

संकेत स्‍थळ-  राजीव गाधी जीवनदायी आरोग्‍य योजना

राजीव गाधी जीवनदायी आरोग्‍य योजना माहीती पुस्तिका





Tuesday, August 16, 2016

बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजार

यवतमाळ जिल्‍हाधिकारी कार्यालयात बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजार चे आयोजन


दि.७.०४.२०१६ रोजी पासून जिल्‍हाधिकारी कार्यालयातील परिसरात प्रत्‍येक शुक्रवारी सायं. ४.०० ते ७.०० या वेळेत शेतक-यांचा शेतमाल खरेदी विक्री बाजाराचे आयोजन करण्‍यात येते, या बाजारामध्‍ये शेतकरी आपल्‍या शेतातील पिकवलेला शेतमाल कार्यालय परीसरात विक्रीकरीता आणतात. यामधून शेतक-यांची आर्थीक उन्‍नती व्‍हावी, त्‍यांना जास्‍तीत-जास्‍त नफा मिळावा हा यामागचा उद्देश आहे.
यामध्‍ये फळे, भाजीपाला, कडधान्‍य इत्‍यादी प्रकारच्‍या मालाचा समावेश आहे. बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजारामध्‍ये शेतक-यांना त्‍यांचा माल थेट ग्राहकांना विकण्‍याची संधी प्राप्‍त होते. या ठिकाणी त्‍यांना हमाली, दलाली किंवा कोणत्‍याही प्रकारचे शुल्‍क आकारले जात नाही. बाजारामुळे शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात वाढ झाली असून कार्यालय परीसरात भाजीपाला विकल्‍यामुळे त्‍यांना ठोक विक्रीपेक्षा जास्‍तीचा नफा मिळतो, तसेच शासकीय कर्मचा-यांना व इतर नागरीकांना ताजा भाजीपाला मिळतो व त्‍यांचा बाजारात जाण्‍याचा वेळही वाचतो. या बाजारामुळे कर्मचारी, नागरीकांना व शेतक-यांनाही समाधान मिळत आहे. जिल्‍हाधिकारी कार्यालयाप्रमाणे जिल्‍हयातील इतरही सर्व शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, कॉलणी यामध्‍ये सुध्‍दा थेट शेतमाल विक्री बाजाराचे आयोजन केल्‍या जात आहे.

शेतक-यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील शेतमाल विक्री बाजारामध्‍ये सहभागी होण्‍याकरीता खालील क्रमांकावर संपर्क साधावा-
बळीराजा चेतना अभियान कक्ष- ०७२३२-२४४१०० (टोल फ्रि क्र.-१८०० २३३ ६३६०)

सार्वजनिक बँकांच्या आस्थापनेवर 'लिपिक' संवर्गातील पदांच्या जागा (IBPS)


आयबीपीएस(IBPS) मार्फत देशातील विविध सार्वजनिक बँकांच्या आस्थापनेवरील 'लिपिक' संवर्गातील पदांच्या जागा भरण्यासाठी एकत्रित सामाईक परीक्षा नोव्हेंबर/ डिसेंबर २०१६ मध्ये घेण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्‍टेंबर २०१६ आहे.






Monday, August 15, 2016

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 'तलाठी' पदांच्या ७ जागा

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 'तलाठी' पदांच्या ७ जागा



जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील 'तलाठी' पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०१६ आहे.


Wednesday, August 10, 2016

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना


       शेती व्‍यवसाय करताना होणरे अपघात, विज पडणे, पूर, सपदंश, विचूदुंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्‍त्‍यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच, अन्य कोणत्‍याही कारणा मुळे होणारे अपघात, यामळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्‍यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्‍व येते. घरातील कर्त्‍या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटंबाचे उत्‍पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्‍त शेतकऱ्यांस/त्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाकार्यान्वित केली आहे. सदर योजना अतंर्गत रु.2.00 लाख इतक्‍या विमा संरक्षण देण्यात येते.
  
लाभार्थ्‍याचे पाञता निेकष
शेतकरी म्‍हणून म‍हसूल कागदपञे ७/१२, ६ क, ६ ड (फेरफार) यामध्‍ये नोंदणीकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी.   

विमा संरक्षणासाठी सामाविष्‍ट असलेले अपघात
  • रस्‍ता/रेल्‍वे अपघात
  • बुडून मृत्‍यु
  • विष बाधा
  • विजेचा धक्‍का
  • विज पडणे
  • नक्षलवादी हल्‍ला
  • उंचावरून पडणे
  • सर्पदंश
  • प्राणीदंश
  • खुन
  • जनावराचा हल्‍ला
  • दंगल
  • इतर अपघात


दावा सादर करण्‍यासाठी आवश्‍यक कागदपञे
  • दावा पञ
  • ६-ड (फेरफार/ गाव नमुना)
  • वारस नोंद-उतारा ६ क
  • शव विच्‍छेदन अहवाल
  • शेतक-याचा वयाचा पुरावा
  • पोलिस स्‍थळ पंचनामा
  • पोलिस (F.I.R.) किंवा जवाब
  • अंपगत्‍व आल्‍यास टक्‍केवारी प्रमाणपञ
  • बॅंक पासबुक प्रत
  • लाभारर्थ्‍याचे स्‍टॅम्‍प पेपरवर प्रतिज्ञापञ
  • सातबारा उतारा
  • मृत्‍यु प्रमाणपञ
  • तलाठी प्रमाणपञ
  • पोलिस मरणोत्‍तर पंचनामा


विम्‍यापासुन मिळणारे आर्थिक लाभ
  • अपघाती मृत्‍यु                                      -  रू २,००,०००/-
  • अपघाता मुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे   -  रू २,००,०००/-
  • अपघाता मुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे       -  रू २,००,०००/-
  • अपघाता मुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे   -  रू १,००,०००/-


अर्ज सादर कुठे करावा
सदर योजनेचा लाभ घेण्‍यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबधित जिल्‍हा / तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे आवश्‍यक कागद पञांस‍हीत दावा अर्ज दाखल करा. अधिक माहिती...


    (छायाचिञ सौज्‍यन - कृषी विभाग,महाराष्‍ट्र शासन)


Tuesday, August 9, 2016

शेतकरी मासिक ॲन्ड्राईड ॲप्लीकेशन

शेतकरी मासिक ॲन्ड्राईड ॲप्लीकेशन

       महाराष्‍ट्र शासनाच्‍या कृषि विभागामार्फत सन १९६५ पासुन शेतक-यांच्‍या हितार्थ व सेवार्थ प्रकाशित होणरे शेतकरी मासिक शेतक-यांमध्‍ये अतिशय लोकप्रिय आहे. शेतकरी मासिकाच्‍या माध्‍यमातुन कृषि क्षेञातील नवे संशोधन, आधुनिक तंञज्ञान, शासनाच्‍या विविध योजना व कृषि क्षेञातील लक्षवेध घडामोडी तसेच कृषि संलग्‍न व्‍यवसायाबाबतची माहिती शेतक-यांपर्यत पो‍हचविण्‍यात येते. सध्‍या शेतकरी बांधवांमध्‍ये विविध माहीती आत्‍मसात करण्‍यासाठी माहीती  तंञज्ञानाचा वापर मोठया प्रमाणत होत आहे. तसेच  मोबाईलचा वापरही मोठया प्रमाणत होत आहे. याचाच विचार करून शेतकरी मासिक हे ॲन्ड्राईड मोबाईल करीता गुगल प्‍ले स्‍टोअर वर टाकण्‍यात आले आहे.


       सदर शेतकरी मासिक ॲन्ड्राईड ॲप्लीकेशन शेतक-यांकरीता उपयोगाचे असुन या माध्‍यमातुन शेतकरी मासिक शेतक-याकरीता निशुल्‍क उपलब्‍ध करण्‍यात आले आ‍हे. शेतक-यांना सदर मासिक वर्ष व महिना निहाय डाऊनलोड करून वाचता येईल. शेतकरी मासिक ॲन्ड्राईड ॲप्लीकेशन आकार 2 MB पेक्षा कमी असल्‍यामळे स‍हज डाऊनलोड करता येते.





        सदर शेतकरी मासिक महाराष्‍ट्र शासनाच्‍या कृषी विभागाच्‍या संकेत स्‍थळावर सुध्‍दा उपलब्‍ध आ‍हे. शेतकरी मासिक लिंक 

Monday, August 8, 2016

श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍तीवेतन योजना

श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍तीवेतन योजना

पात्रतेचे निकष,अटी,शर्ती
वय
65  व 65 वर्षावरील

आर्थिक सहाय
प्रती लाभार्थी प्रतिमा‍ह रुपये 600/-

पात्रतेची अर्हता
कुटुबांचे नाव ग्रामिण /शहरी दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्‍या यादीत समाविष्‍ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्‍न रुपये 21000/- पर्यंत असावे.

वयाचा दाखला
ग्रामपंचायत,नगरपालीका/महानगरपालीकेच्‍या जन्‍मनोंद वहीतील उता-याची साक्षांकीत प्रत किंवा शाळा सोडल्‍याचा दाखला शिधापत्रिकेमध्‍ये अथवा निवडणुक मतदार यादीत नमुद केलेल्‍या वयाचा उतारा किंवा ग्रामिण/नागरी रुग्‍णालयाच्‍या वैदयकीय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला.

उत्‍पन्‍नाचा दाखला
तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्‍या यादीमध्‍ये त्‍या व्‍यक्‍ती/ कुटुंबाचा समावेश असल्‍याबददलचा साक्षांकीत उतारा.

इतर अटी

रहिवासी दाखला शासनाच्‍या अन्‍य कोणत्‍याही  योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्‍यक्‍ती श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍तीवेतन योजनेखाली लाभ घेण्‍यास पात्र राहणार नाही.

अर्ज सादर कुठे करावा
अर्ज त‍हसील कार्यालयास सादर करावा.

Sunday, August 7, 2016

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना

पात्रतेचे निकष,अटी,शर्ती

वय
65 वर्षापेक्षा कमी असावे.

कुटुंबाचे उत्‍पन्‍न
प्रतिवर्षी रुपये 21000/- पर्यंत.

आर्थिक सहाय
एक व्‍यक्‍ती निराधार कुटुंबाला प्रतिमा‍ह रुपये 600/-, एकापेक्षा जास्‍त लाभार्थी कुटुंबाला रुपये 900/- प्रतिमाह या मर्यादेत.

पात्रतेची अर्हता
अपंग, दुर्धर आजार, निराधार स्‍त्री/पुरष, विधवा,घटस्‍फोटित,अनाथ मुले,परीत्‍यक्‍ता आत्‍महत्‍या  केलेल्‍या शेतक-याच्‍या कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्‍न या योजनेखालील विहीत उत्‍पन्‍नापेक्षा कमी असल्‍यास ते कुटुंब.

वयाचा दाखला
ग्रामपंचायत,नगरपालीका/महानगरपालीकेच्‍या जन्‍मनोंद वहीतील उता-याची साक्षांकीत प्रत किंवा शाळा सोडल्‍याचा दाखला शिधापत्रिकेमध्‍ये अथवा निवडणुक मतदार यादीत नमुद केलेल्‍या वयाचा उतारा किंवा ग्रामिण/नागरी रुग्‍णालयाच्‍या वैदयकीय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला.

उत्‍पन्‍नाचा दाखला
तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्‍या यादीमध्‍ये त्‍या व्‍यक्‍ती/ कुटुंबाचा समावेश असल्‍याबददलचा साक्षांकीत उतारा.

इतर अटी
रहिवासी दाखला, अपंगाचे प्रमाणपत्र,असमर्थतेचा/रोगाचा दाखला,अनाथ असल्‍याचा दाखला.

अर्ज सादर कुठे करावा
अर्ज त‍हसील कार्यालयास सादर करावा.

Friday, August 5, 2016

आम आदमी बिमा योजना

आम आदमी बिमा योजना
     


       राज्यात ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी शासनाने केंद्र सरकारची आम आदमी बिमा योजना,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमहाराष्ट्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी बिमा योजनेसंबंधात नोडल एजन्सीअंमलबजावणी यंत्रणालाभार्थ्याचे निकषविमा हप्त्याची रक्कमनिधीची तरतूदभरपाईची रक्कमअंमलबजावणी पध्दती याबाबत तपशील पुढीलप्रमाणे आहेः-

लाभार्थी निकष

या योजनेचे लाभार्थीग्रामीण भागातील भूमीहीन कुटुंबातील १८-५९ वयोगटातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक मिळवती व्यक्ती असेल.

वयाचा पुरावा

  • शिधापत्रिका
  • जन्म दाखला
  • शैक्षणिक दाखला
  • मतदार ओलखपत्र
  • प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

भरपाईची रक्कम

  • विम्याच्या अंतिम मुदतीपूर्वी सदस्याचा मृत्यु झाल्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून वारसास आश्वासित रक्कम रूपये ३०,०००/- मिळेल.
  • सदस्याचा अपघाती मृत्यु झाल्यास रूपये ७५,०००/-
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यास रूपये ७५,०००/-
  • अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास रूपये ३७,५००/- भरपाई मिळेल.

 

शैक्षणिक लाभ

सदस्याच्या ९ वी ते १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या २ मुलांना भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून प्रति तिमाही प्रति मुलास रूपये ३००/- शिष्यवृत्ती मिळेल. या योजनेबाबतची कार्यप्रणाली खालीलप्रमाणे राहीलः-
  • शासनाकडून विम्याच्या हप्त्याची रक्कम दिल्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल.
  • भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रधान सचिवसामाजिक न्याय व विशेष सहाय्यमहाराष्ट्र शासन यांच्या नावाने मास्टर पॉलिसीनिर्गमित करेल.
  • या योजनेअंतर्गत प्राप्त होणारे भरपाईबाबतचे अर्ज तहसिलदारांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पी ॲन्डजी एस युनिटकडे पाठवावेत. या संदर्भातील भरपाईचे धनादेश भारतीय आयुर्विमा महामंडळ संबंधित लाभार्थ्याच्या नावाने निर्गमित करेल.
  • शिष्यवृत्ती अनुदेय विद्यार्थ्याची ओळख तलाठी करतील व ज्या सदस्यांची मुले शिक्षण शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरतीलत्यांचे अर्ज संकलित करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतील व जिल्हाधिकारी या अर्जाची यादी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पी ॲन्ड जी एस युनिटकडे पाठवतील. या यादीमध्ये विद्यार्थ्याचे नावशाळेचे नावसदस्याचे नावमास्टर पॉलिसी नंबर आणि सदर सदस्याचा नंबर इ.बाबींचा समावेश असेल. भारतीय आयुर्विमा महामंडळ विद्यार्थ्यांच्या यादीसह धनादेश जिल्हाधिका-यांकडे देईल. जिल्हाधिकारी सदरच्या रकमेचे वितरण तहसिलदारामार्फत संबंधित विद्यार्थ्यांना करतील.
    या योजने अंतर्गत सदस्य झालेल्या व्यक्तीस राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या अन्य विमा योजनांचा लाभ अनुज्ञेय राहणारनाही.