बळीराजा
चेतना अभियानातर्फे शेतक-यांमध्ये सकारात्मक विचारांचा प्रचार आणि प्रसार
करण्याकरिता ‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये शेतक-यांसाठी शेती, पीके, मनोधैर्य वाढविण्यासाठी उपाय, किड नियंत्रन, माती परीक्षण, विमा
अशा शेती व त्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नोउत्तरे या स्पर्धेत विचारण्यात
येणार आहे. ही स्पर्धा १ त १० सष्टेंबर २०१६ या दरम्यान होणार असून प्रथम दहा,
व्दितीय सात तर तृतीय पाच हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यास्पर्धेत
जिल्हयातील शेतक-यांनी सहभागी व्हावे.
शेतक-यांचे
मनोधैर्य वाढवून त्यांच्या जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी जिल्हयात
बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतक-यांत जागृती व्हावी
यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यातील एक उपक्रम म्हणून शेतक-यांसाठी
शेतीविषयक निगडीत ‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरे स्पर्धा आयोजित
करण्यात आली आहे. या स्पर्धेत शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील सदस्य यात सहभागी
होऊ शकणार आहे. या स्पर्धेचा कालावधी १ ते १०
सप्टेंबर २०१६ असा राहणार आहे.
स्पर्धेची
प्रश्नपत्रिका ही शेतक-यांना तहसील कार्यालयामार्फत तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून
शेतक-यांना उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रश्नांचे उत्तर
देतांना नकळतच शेतक-यांना आपण कशाप्रकारे वागलो म्हणजे आपली मनोवृत्ती सकारात्मक
राहिल व आपली आपल्या जीवनामध्ये कशी उन्नती होईल याबद्दलचा बोध होणार आहे. या
सपर्धेत शेतक-यांचे सामाजिक कर्तेव्ये, शेतीचे आर्थिक
नियोजन, जमीन, पर्यावरण, ताण-तणाव दूर करण्यासाठी उपयोजना, पिक विमा,
पाल्याचे विवाह, सेंद्रिय शेती अशा विविध
शेती व शेतकरी कुटुंबाशी निगडीत २० गुणांची ही प्रश्नपत्रिका राहणार आहे.
स्पर्धेचे
मुल्यमापणासाठी उत्तरपत्रिका तालुकास्तरावर गोळा केल्या जाणार असून तालुकास्तरीय
समितीमार्फत त्यांची तपासणी केल्या जाणार आहे. यात
सर्वाधिक गुण असलेल्या प्रथम ३ किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी समान गुण घेणारे
असल्यास त्या स्पर्धकांची नावे जिल्हास्तरावर पाठवली जाणार आहे. जिल्हास्तरावरील बळीराजा चेतना अभियान समिती यापैकी लकी ड्रॉ पदधतीने
अंतिम ३ लोकांची निवड करण्यात येणार आहे.
पारितोषिकांचे
स्वरूप
प्रथम
बक्षीस -१०,००० हजार
व्दितीय
बक्षीस -७,००० हजार
तृतीय
बक्षीस -५,००० हजार
अधिक
माहीती करीता संपर्क
बळीराजा
चेतना अभियान
जिल्हाधिकारी
कार्यालय, यवतमाळ
संपर्क-०७२३२-२४४१००