Friday, January 20, 2017

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना

अ क्र
योजना
सविस्तर माहिती
1
योजनेचे नाव
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
2
योजनेचा प्रकार
केंद्र पुरस्कृत योजना
3
योजनेचा उददेश
राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन
4
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव
सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
5
योजनेच्या प्रमुख अटी
दारिद्रय रेषेखालील 65 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून गट (अ) रु.400/- प्रतिमहा निवृत्तीवेतन मिळते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये 400/-प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रतिमहा असे एकूण रुपये 600/-प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.
6
दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
7
अर्ज करण्याची पध्दत
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
8
योजनेची वर्गवारी
निवृत्तीवेतन
9
संपर्क कार्यालयाचे नाव
जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

स्‍ञोत - https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assist

Tuesday, January 17, 2017

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

अ क्र
योजना
सविस्तर माहिती
1
योजनेचे नाव
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
2
योजनेचा प्रकार
केंद्र पुरस्कृत योजना
3
योजनेचा उददेश
आर्थिक सहाय्य
4
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव
सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
5
योजनेच्या प्रमुख अटी
दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
6
दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
7
अर्ज करण्याची पध्दत
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
8
योजनेची वर्गवारी
आर्थिक सहाय्य
9
संपर्क कार्यालयाचे नाव
जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

स्‍ञोत - https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assist

Saturday, January 14, 2017

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क' पदांच्या ३०० जागा

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क' (गट-) पदांच्‍या एकुण ३०० जागा करीता 'दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क' (गट-) पूर्व परीक्षा-२०१ रविवार दिनांक २८ मे, २०१७ रोजी घेण्‍यात येणार असून उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्‍यात येत असुन अर्ज ऑनलाईन भरण्‍याची शेवटची तारीख फेब्रुवारी २०१ आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

अ क्र
योजना
सविस्तर माहिती
1
योजनेचे नाव
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
2
योजनेचा प्रकार
केंद्र पुरस्कृत योजना
3
योजनेचा उददेश
राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन
4
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव
सर्व प्रवर्गातील अपंगांना लागू आहे.
5
योजनेच्या प्रमुख अटी
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त 18 ते 65 वर्षाखालील वयोगटातील 80% हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.