Tuesday, November 21, 2017

शेळया खरेदीत घ्‍यावयाची काळजी



सौज्‍ान्‍य - सह्याद्री वाहीनी


स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लिपिक/ पोस्टल असिस्टंट पदांच्या ३२५९ जागा



स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लिपिक/ पोस्टल असिस्टंट पदांच्या ३२५९ जागा करीता पाञ उमेदवारांकडून अर्ज मागविण्‍यात येत असुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१७ आहे.






भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर 'ऑफिस अॅडेंटंट्स' पदाच्या एकूण ५२६ जागा



भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर 'ऑफिस अॅडेंटंट्स' पदाच्या एकूण ५२६ जागा करीता पाञ उमेदवारांकडून अर्ज मागविण्‍यात येत असुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ डिसेंबर २०१७ आहे.






Tuesday, September 5, 2017

राष्ट्रीयकृत बँकात 'लिपिक' पद भरती(IBPS Clerk 2017)

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 'निम्नस्थर लिपिक' पदांच्या १०७ जागा

सैनिक कल्याण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३९ जागा

शुभमंगल सामुहिक, नोंदणीकृत व‍िवाह योजना

Thursday, August 31, 2017

शेकरू(Shekru) शेतक-यांकरीता उपयुक्‍त Android App

Baliraja Chetna Abhiyan


शेकरू(Shekru)  शेतक-यांकरीता उपयुक्‍त Android App

शेकरू हे स्मार्टफोन आधारित दुहेरी भाषायुक्त मोफत मोबाईल शेतक-यांकरीता बनवले उपयुक्‍त मोबाइल अॅप्लीकेशन आहे. या अॅप्लीकेशनमध्ये शेती क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम, योजना, ध्वनिफिती, कृषी शिक्षण, कृषी कौशल्य विकास, आर्थिक स्त्रोत याबद्दल माहिती दिली जाते. आणि यातील सर्व माहिती मराठी व इंग्रजी भाषेमध्ये प्रस्तुत केली आहे. 

शेकरूमध्ये कृषी सहकार्यासाठी विविध भागधारक, राज्य कृषी मंत्रालय इ. यांचे कृषी क्षेत्राशी निगडीत उपक्रम व योजना सूचीबद्ध आहेत. प्रत्येक योजनेची माहिती संक्षिप्त स्वरुपात प्रस्तुत केली आहे तसेच हि माहिती आपण ईमेल तथा शेअर करू शकता. योजनांमध्ये अनुदानापासून ते कर्ज स्वरुपात आर्थिक मदत, विमा सुविधा इ. बाबी समाविष्ट आहेत. वापरकर्त्यास विशिष्ट स्त्रोतापासून प्रकाशित नवीन किंवा सुधारित योजना सूचित केल्या जातात.

शेकरूच्या ध्वनिफिती दालनातून कृषी क्षेत्राशी निगडीत विविध स्त्रोत यात प्रामुख्याने प्रगतीशील शेतकरी, व्यावसायिक, शेतीतज्ञ, विचारवंत, संस्था, कंपन्या, नोकरशाह, शासकीय व अशासकीय संस्था, समुदाय रेडीओ, यांच्या शेतीशी निगडीत विविध विषयांवर मार्गदर्शनपर ध्वनिफिती आपण डाउनलोड करून ऐकू शकता. यात प्रामुख्याने मुलाखत, चर्चा, अहवाल सादरीकरण, सल्ला, ज्ञान, कौशल्य, आपली मते, सेवा यांचा समावेश आहे. यात वापरकर्ते विशिष्ट स्त्रोतानुसार ध्वनिफिती अनुसरण करू शकता तसेच यात नवीन तथा सुधारित प्रकाशित ध्वनिफिती भाग सूचित केले जातात. 

सदर मोबाइल अॅप मराठी आणि इंग्रजी मध्‍ये गुगल प्‍ले स्‍टोर वरती उपलब्‍ध आहे.


डाऊनलोड




Monday, August 21, 2017

शेळीपालन एक मूल्यवर्धित व्यवसाय


सौज्‍ान्‍य - सह्याद्री वाहीनी

दालचिनी मसाला पिकाचे काढणी पश्चात व्यवस्थापन...



                                                                  सौज्‍ान्‍य - सह्याद्री वाहीनी

Sunday, August 20, 2017

Friday, August 11, 2017

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 'प्रशासकीय अधिकारी' पदांच्या ३०० जागा


ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 'प्रशासकीय अधिकारी' पदांच्या ३०० जागा करीता पाञ उमेदवारांकडून अर्ज मागविण्‍यात येत असुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ संप्‍टेबर २०१७ आहे.

Thursday, August 10, 2017

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स



शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून सरकारने अनेक वेबसाईट आणि पोर्टल्स उपलब्ध करुन दिलेले आहेत.
ज्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक हिताच्या योजनांची घरबसल्या माहिती घेता येऊ शकते. शिवाय कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळवता येऊ शकते.

1. माती आरोग्य कार्ड योजना
मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या सेतू किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपले स्वतःचे खाते तयार करावे लागते. या कार्डअंतर्गत त्या भागातील प्रयोगशाळेत मातीचे आरोग्य तपासले जाते. त्यावरुन संबंधित शेतातील मातीत कोणते पीक चांगले येऊ शकेलत्याला पोषक औषधे आणि त्यांचे प्रमाण कसे असावेयाची माहिती मिळवता येते. या सुविधेमुळे शेतकरी आपल्या शेतीला पोषक असे पिक घेऊ शकतात. या संकेतस्थळावर मराठी भाषेसह एकूण 22 भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.

2. शेतकरी पोर्टल
शेतकरी www.farmer.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांचे गावगटजिल्हा किंवा तालुका निवडावा लागतो. त्यानंतर आवश्यक त्या पीकासंबंधित माहिती किंवा किटकनाशकेपीककर्ज यांबाबत सर्व विस्तृत माहिती या वेबसाईटवर मिळते. ही माहिती आपल्याला समजणाऱ्या भाषेतील मजकूरएसएमएसई-मेल किंवा ऑडिओ किंवा व्हिडीओ अशा स्वरुपात दिली जाते. गृहपृष्ठावर देण्यात आलेल्या भारताच्या नकाशाद्वारे सहजपणे या पातळ्यांवर जाता येते. शेतकऱ्यांना विशिष्ट प्रश्न विचारता येतील तसेच प्रतिक्रियाही देता येते.

3. मेरा किसान पोर्टल
हे एक मोबाईल किसान पोर्टल म्हणून परिचित आहे. www.mkisan.gov.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध प्रकारची माहिती मिळवता येते. त्यासाठी अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तसेच मोबाईल सेवेद्वारे एसएमएसद्वारेही माहिती मिळवू शकतात. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांचा पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

4. पंतप्रधान पीक विमा योजना
शेतकऱ्यांवर विम्याचे कवच असावे यासाठी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेतर्गत प्रत्येक पिकावर विमा पद्धत उपलब्ध आहे. www.agri-insurance.gov.in या वेबसाईटवर मेंबर होणं गरजेचे आहे. त्यानंतर विम्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. स्वत:शी संबंधित सर्व माहिती भरल्यानंतर हिंदी भाषेत पुढील पर्याय उपलब्ध आहेत.

5. पंतप्रधान कृषी विकास योजना
शेतकरी पावसावर अवलंबून असतो. मात्र हे अवलंबित्व कमी करुन प्रत्येक शेतात पाणी पोहचवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतात पाणी साठवणेसिंचन आणि जलसंधारणाचे विविध पर्याय www.pmksy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सोबतच शासनाच्या या उपक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

6. राष्ट्रीय शेती बाजार
शेतकऱ्यांना त्यांचा माल आवडत्या बाजारात विकता यावा किंवा ग्राहकांना कोणत्या मालाचा बाजारबाव काय आहे याची घरबसल्या माहिती घेता यावी या उद्देशाने राष्ट्रीय शेती बाजार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. www.agmarknet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेती मालाचा सध्याचा बाजारभाव तसेच ग्राहकांनाही ऑनलाईन बाजारभाव पाहता यावा याविषयीचे पर्याय उपलब्ध आहेत. पीक निवडून राज्यजिल्हातालुका आणि जवळची बाजारपेठ निवडणे असे पर्याय या संकेतस्थळावर आहेत.

7. ई-राष्ट्रीय शेती बाजार
राष्ट्रीय शेती बाजार या योजनेप्रमाणेच शेतीमाल विक्री किंवा बाजारात शेतीमाल येण्याची वेळबाजारभाव आणि खरेदी विक्री यांची माहिती www.enam.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या या संकेतस्थळावर देशभरातील काही मुख्य बाजारपेठांचा समावेश केला आहे. त्या बाजारपेठेमध्ये सध्या कोणत्या शेतीमालाला काय बाजारभाव मिळत आहेहे पाहता येते. सोबतच ग्राहकांना देखील या संकेतस्थळाद्वारे खरेदी करण्यासाठी बाजारभावाविषयी खात्रीशीर माहिती मिळवता येते.

8. राष्ट्रीय यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान पोर्टल
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची कास धरायला लावणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. www.farmech.dac.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर शेतीत आधुनिकीकरण कसं आणावं याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. कोणत्या पिकासाठी कोणत्या यंत्राचा कसा वापर करावा ते या वेबसाईटवर व्हिडीओसह उपलब्ध आहे. यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करणं सोप आहे...