Thursday, October 27, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ८ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ८



Tuesday, October 25, 2016

शेतकरी यशोगाथा (शेतकरी - देवराव ठावरी)


आधुनिक शेतीची कास धरलीशेतात प्रगती साधली





रीप हंगामावर शेतक-याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. यातच शेतीवरील खर्च ही सर्वात मोठी बाब आज बनली आहे. अशाही स्थितीत उत्‍तम नियोजन, इच्‍छाशक्‍ती असल्‍यास सर्व काही शक्‍य होते....असाच अनुभव आहे तो मारेगाव तालुक्‍यातील केगाव येथील देवराव सखाराम ठावरी यांचा. परीसरातील बाजारपेठांचा अभ्‍यास करून वर्षातील तीनही हंगामात पिकांची लागवड करून ग्राहकांपुडे विविधता ठेवणे, स्‍वतःहा मालाची विक्री करणे आदि वैशिष्‍टयांमुळे शेतीमध्‍ये आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपरिक शेतीला बगल देत सर्व कुटुंबाच्‍या मदतीने नियंत्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. यातून शेती फायदेशिर व शाश्‍वत होऊ लागली. शेतीचे तंत्र अधिकाअधिक जमजावून घेतल्‍याने अनावश्‍यक खर्च टाळता येऊन शेतीचा विकास घडवून आणता आला. नुकतीच जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी त्‍यांच्‍या शेतीला भेट दिली.


................................................................................................
मारेगाव तालुक्‍याच्‍या ठिकाणावरून ५ किलोमीटरवर अंतरावर आदिवासी बहुल हजार लोकसंख्‍येच  केगाव हे छोटसं गाव. १० पर्यत शिक्षण घेतलेले देवराव ठावरी यांच्‍याकडे वडीलोपा‍र्जीत ८ एकर शेती. पूर्वापारपासून कापूस, सोयाबीन, तूर या पारंपारिक पिकांची लागवड करीत. कधी नैसर्गिक आपत्‍तीत पिकांचे नुकसान तर कधी कोरडया दुष्‍कामुळे पिकांचे कोवळे अंकुर करपायचे. ना नफा ना तोटा लावलेला खर्च तेवढा या शेतीतून निघायचा. पत्‍नी, तीन मुले, सुना यांची साथ मिळाली. पुणे जिल्‍हयातील तळेगावा दाभाडे येथील काढणी पश्‍चात तंत्रज्ञान केंद्रात प्रशिक्षणात सहभाग घेतला. यातून बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा, हवामानाचा, बाजारापेठेचा अभ्‍यास करून  शेतीचे नियोजन केल्‍यास शेती फायद्यायाची ठरू शकते हे त्‍यांनी हेरले यातूनच शेतीत विविध प्रयोग राबविण्‍यास सुरवात झाली.  
............................................................................................
संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली
जमीन मध्‍यम स्‍वरूपाची असून चढ उताराची होती. शेतात विहिरीची सुविधा असूनही पाणी देण्‍यास मोठी अडचण यायची. यातून केवळ दोन एकर क्षेत्रच हंगामी ओलीताखाली यायची. यातून पाणी असूनही पीके घेण्‍यास अडचण याचची. त्‍यामुळे संपूर्ण शेतीचे सपाटीकरण करून शेती समतल केली. कृषी विभागाच्‍या विविध प्रशिक्षण कार्यशाळेतून ज्ञान आत्‍मसात करून संपूर्ण शेती ओलीता खाली आणण्‍याचे ठरविले. पुढे विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत वडीलोपार्जित ८ एकर शेती सुरवातली ठिबक सिंचनाखाली आणली. यात फुलकोबी, टमाटर, काकडी, पालक मेथी, तर दोन एकर क्षेत्रावर सायोबीन व रब्‍बीत हरभरा, उन्‍हाळी भूईमुंग हे पीके ठिबक सिंनाखाली घेतात.
.................................................................
पारंपरिक पिकांना तिलाजंली
आठ एकर शेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड पारंपरिक पध्‍दतीने खरीप हंगामात करायचे. मात्र, निर्सगाच्‍या लहरीपणामुळे जेमतेम उत्‍पन्‍न पदरी पडायचे. संयुक्‍त  कुटुंब असल्‍याने कुटुंबाचा गाडा चालविणे म्‍हणजे तारेवरची कसरत व्‍हायची. यातून पिक पध्‍दतीत बदल केल्‍यास विस्‍कटलेली आर्थिक घडी बसू शकते. असा कुटुंबातील सर्वानिच निर्यण घेतला आणि आज तो प्रत्‍यक्षात आणला. शेडनेट, ठिबक, पॉलि मल्‍चिंग ( प्‍लास्‍टीक आच्‍छादन) करून भाजीपाला पिके घेण्‍याचे ठरविले. यातून दररोज उत्‍पन्‍न हातात येऊ लागले.
...................................................................................
कुटुंबच रंगतोय शेतीवर
कुटुंब प्रमुख वडील देवराव ठावरी आजपर्यंत शेतीत राबत होते. मात्र, आता याला जोड मिळाली मोठा मुलगा राहुल, मधवा प्रफुल आणि लहान अतुल या तिघांची. पत्‍नी छबूबाई, सुन मनिषा, सुनंदा हे सर्वजन शेतावर राहत असून शेतीत काम करीत आहे. शेती उत्‍तम व्‍हावी, त्‍यातून भरघोस उत्‍पन्‍न निघावे यासाठी असर्व कुटुंब झटत आहे. कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍य नियोजन करून आपली जबाबदी पार पाडतात. कुठल्‍या दिवशी शेतामध्‍ये काय काम करावे याचे नियोजन वडील, मुले, पत्‍नीने ठरवितात. बाजारपेठ, वाहतूक, माल काढणी अशी शेतातील 60 टक्‍के कामे घरातील सदस्‍य करीत असून 40 टक्‍के कामे मजूराकरवी करून घेण्‍यात येतात.
.........................................................................
अर्ध्‍या एकरावर शेडनेट
आपल्‍या जवळ असलेल्‍या 7 एकरावरील शेतामधील अर्धा एकर जागेवर कृषी विभागाच्‍या सहाकार्याने शेडनेटची उभारणी केली. यामध्‍ये पहिल्‍याच हंगामात शेडनेटमध्‍ये काकडी व पालक, मेथी लागवडीतून तर उर्वरित क्षेत्रावर मल्‍चींग आच्‍छादनाचा वापर करून टमाटर व फुलकोबी  या भाजीपाला पिकांची लागवड केली. यातून एक लाख १ लाख ४०  हजार रूपयांचे उत्‍पन्‍न हाती आले. त्‍यामुळे शेडनेट व मल्‍चींग पध्‍दतीने लागवड केलेल्‍या शेतीत पाण्‍याचा अपव्‍यय टाळता आला आणि उत्‍पादनही  घेता आले.
..................................................................................
आधुनिक अवजारांचा वापर
शेतातील उत्‍पन्‍नावर सुधारणा होत असताना आता शेतीत आधुनिक यंत्राचा वापर  करण्‍याकडे कुटुंबाचा कल वाढला. यातून ट्रक्‍टर, पेरणीयंत्र, रोटाव्‍हेटर, पंजी, बीबीएफयंत्र, दोनफाळी नांगर आणि इतर यंत्र खरेदी करण्‍यात आली. स्‍वतःहाच ही सर्व यंत्रे तीनही भाऊ चालवित असल्‍याने शेत मशागतीचे काम हलके होऊन शेतमजूरांचा अनाठायी खर्च वाचू लागला. इतकेच नव्‍हेतर ही यंत्रे इतर शेतक-यांना किरायाने देत असून यातून शेतीला जोडधंदाही लाभला आहे.
.......................................................................................
मे महिन्‍यापासून लागवडीचे नियोजन
कोबी, टमाटर, काकडी, मेथी,  पालक यासारखे भाजीपाले पिकांचे रोप व लागवडीचे  नियोजन मे महिन्‍यापासून करण्‍यात येते. याकाळात भाजीपाला उत्‍पादन मंदावत असल्‍याने पिकांना चांगला दरही मिळतो. तर कोबी आणि काकडी मल्‍चींग पध्‍दतीवर शेटनेटमध्‍ये लागवड करण्‍यात येत असलून सनासुधींच्‍या हंगामात भाजीपाला पिकांची मागणी वाढते. अशाच प्रकारचे नियोजन पावसाठी व हिव्‍हाळी हंगामात करीत असल्‍याने बाराही महिने भाजीपाला पिकांना चांगली मागणी असते.  
...........................................................................
परीसरातील बाजारापेठेत विक्री
मारेगावपासून वणी, भद्रावती, करंजी, पांढरकवडा, मारेगाव कुंभा या ठिकाणी बाजार भरत असल्‍याने याठिकाणी स्‍वतःहा भाजीपाल्‍याची विक्रीचे दुकान लावतात. यातून खर्च वजा जाता चांगला नफाही  मिळत आहे. तीनही भावंडे आदल्‍या दिवशी मालाची काढणी काढणीपासून तर विक्रीपर्यंतचे काम करतात.
जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची शेताला भेट
देवराव ठावरी यांच्‍या शेतीला जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी भेट देऊन त्‍यांच्‍या शेतीची पाहणी केली. शेतामध्‍ये राबवित असलेल्‍या विविध नाविण्‍यपूर्ण प्रयोगांची माहिती घेतली. शेडनेट मधील पीके, यातून निघणारे उत्‍पादन, बाजारपेठ, विक्रीतंत्र, वाहतून शेतीत बदल कसा घडविला, आंतरपिके, भाजीपाला, लागवड तंत्र आदिंची माहिती जाणून घेतली. जिल्‍हयातील अशा प्रगतिशील शेतक-यांची माहिती जिल्‍हयातीलच इतर शेतक-यांपर्यत पोहचली पाहिजे. जेणेकरून इतर शेतक-यांनी त्‍यांचा आदर्श घेऊन अशा पिकांकडे वळेल आणि शेतक-यांची आर्थिक समृध्‍दी येईल.
.............................................................................       
पिक बदलामुळेच प्रगती
पांरपरिक पिके घेताना निर्सगाचा लहरीपणा आणि शेतातून मोजकेच उत्‍पन्‍न पदरी पडत होते. मात्र, आता पिकांत बदल आणि शेडनेटमुळे शेतातून उत्‍पन्‍न निघत आहे. याला कुटुंबातील मुलांची साथ मोलाची ठरली. तसेच तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांची वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.   
देवराव ठावरी, शेतकरी, केगाव
.............................................................................
पुरक व्‍यवसायाकडे वळावे  
जिल्‍हयातील शेतक-यांनी पारंपरिक पिकासोबत पाण्‍याची व्‍यवस्‍था असलयास फळबाग, भाजीपाला, फुलशेती पिकांकडे वळले पाहिजे. मुख्‍य पिकांत आंतरपिकांची लागवड करावी, शेतीसोबत दुग्‍धव्‍यवसाय, शेळीपालन, कुक्‍कुटपालन अशा पुरक व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतीत प्रगती साधता येते. 
दत्‍तात्रेय गायकवाड , जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी
..............................................................................
अभियानाची जनजागृती करणार
शेतामध्‍ये राबविण्‍यात आलेले नाविण्‍यपूर्ण प्रयोगामुळे शेतीत प्रगती साधता आली. त्‍यामुळे इतर शेतक-यांनाही कमि खर्चात, शेतीचे नियोजन, लागवड तंत्रज्ञान, बाजारपेठांचा अभ्‍यास आदि विषयांचे मार्गदर्शन इतर शेतक-यांना बळीराजा चेतना अभियान अंतर्गत करणार आहे. 

...........................................................................................

शब्‍दांकन ः नीलेश फाळके, बळीराजा चेतना अभियान,  जिल्‍हाधिकारी कार्यालय,  यवतमाळ
मोबाईल नंबर ः ९९२२९२०६५६
देवराव ठावरी, शेतकरी, केगावता. मारेगाव जि. यवतमाळ
मो. नं. ९६०४३६८१८२

.......................................................................

Sunday, October 23, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ७ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ७


Monday, October 17, 2016

महाराष्‍ट्र शासनाचे आपले सरकार पोर्टल



आपली तक्रार थेट मा. मुख्यमंत्री यांच्‍या दालनात

हेतू
नागरिकांना त्यांच्या मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सुविधा प्रदान करण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या सुविधेमुळे त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर, तक्रारीच्या सद्यस्थितीचा पाठपुरावा करता येतो आणि निवारणामुळे समाधान झाले किंवा नाही याबाबतचा अभिप्रायही देण्याची सुविधा प्राप्त होते. ही यंत्रणा मुख्यमंत्री कार्यालयाला सर्व तक्रारींचा काळजीपूर्वक पाठपुरावा करू देते आणि प्रत्येक प्रकरणात योग्य कारवाई करण्यात आल्याची खातरजमा करते.

उद्दिष्ट

प्रशासनाद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे जलदगतीने, सोईस्कर आणि प्रभावी निवारण करणे, हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.

अधिक माहिती करीता व्‍हीडीओ प‍हा.


Saturday, October 15, 2016

भारतीय डाक बॅंकेेच्‍या आस्‍थापनेवर विविध पदांच्‍या एकुण ६५० जागा


    भारतीय डाक  बॅंकेच्‍या आस्‍थापनेवर विविध पदांच्‍या एकुण ६५० जागा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्‍टोबर २०१६ आहे.


Thursday, October 13, 2016

स्‍टाफ सिलेक्‍शन कमिशन यांच्‍यामार्फत विविध पदांच्‍या एकुण ५१३४ जागा





           स्‍टाफ सिलेक्‍शन कमिशन मार्फत पोस्‍टल सहायक / क्रमवारी सहायक ३२८१ जागा, कनिष्‍ठ लिपिक १३२१ जागा, डाटा एन्‍ट्री ऑपरेटर ५०६ जागा आणि न्‍यायालयीन लिपिक पदांच्‍या २६ जागा असे एकुण ५१३४ पदे स्‍टाफ सिलेक्‍शन कमिशन यांच्‍यामार्फत भरण्‍यासाठीपाञ उमेदवारांकडून अर्ज मागविण्‍यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्‍हेंबर २०१६ आहे.    

यवतमाळ वन विभागाच्‍या आस्‍थापनेवर 'वनरक्षक' पदांच्‍या ३९ जागा



             यवतमाळ वन विभागाच्‍या आस्थापनेवरील 'वनरक्षक' पदांच्या ३९ जागा भरण्यासाठी पाञ उमेदवारांकडून मागविण्‍यात येत असुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्‍टोबर २०१६ आहे.  




Monday, October 10, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ६ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ६



Tuesday, October 4, 2016

Saturday, October 1, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ५ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ५