Wednesday, November 30, 2016

किसान सुविधा(Kisan Suvidha) Android App



         किसान सुविधा(Kisan Suvidha) हे केद्र सकारने शेतक-यांकरीता बनवले उपयुक्‍त मोबाइल अॅप आहे. किसान सुविधा शेतक-यांना त्वरीत संबंधित माहिती प्रदान करून मदत करणारे एक मोबाइल अॅप आहे. एक बटण क्लिक करून, ते दिवसाचे हवामान आणि पुढील 5 दिवसाचे हवामान, वितरक, बाजारभाव, कृषी सल्ला केंद्रे, वनस्पती संरक्षण, इ. माहिती मिळवू शकता. जवळच्या परिसरातील हवामान सूचना आणि शेतमालाचा बाजारभाव जसे वैशिष्ट्ये आणि राज्य तसेच भारतात कमाल किंमत शक्य तितका सर्वोत्कृष्ट रीतीने शेतकर-यांना सक्षम बनविण्‍या साठी समाविष्ट केले आहे. सदर मोबाइल अॅप हिंदी आणि इंग्रजी मध्‍ये गुगल प्‍ले स्‍टोर वरती उपलब्‍ध आहे.

Tuesday, November 29, 2016

कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम



कोरडवाहू शेतीची उत्पादन क्षमता वाढविणे त्यासाठी विविध सिंचन पर्यायांचा वापर करणे व त्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी सदर कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम राबविला जातो. कार्यक्रमांतर्गत सुक्ष्म व इतर सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जाते.

योजनेचे स्वरूप :
कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवून शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, मुलस्थानी मृद-जलसंधारणासह साखळी बंधारे, शेततळी या माध्यमातून संरक्षीत सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, सुक्ष्म सिंचनाचा वापर करून सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, यांत्रिकीकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे, शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी नियंत्रित शेती, प्राथमिक कृषी प्रक्रीया व पणन सुविधा निर्माण करणे, कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पिक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यास दौरे यांच्या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण योजनेंतर्गत केले जाते.

लाभार्थी निकडीचे निकष :
अल्प, अत्यल्प भुधारक तसेच महिला व मागासवर्गीय शेतकरी यांना प्राधान्य दिले जाते. शेतकरी गटामध्ये सहभागी होवून गटाधारीत उपक्रम राबविण्यास तयार असलेले शेतकरी, मुलस्थानी जलसंधारण पध्दतीचा अवलंब करणारे शेतकरी, सुक्ष्म सिंचन पध्दती अवलंबण्यास तयार असणारे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभाचे स्वरूप :
राज्य योजनेंतर्गत अनुदानाचे प्रमाण १00 टक्के आहे. मनुष्यबळ विकासांतर्गत कर्मचारी, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी संघटना, शेतकरी अभ्यास दौरे इत्यादी उपक्रम राबविले जातात. संरक्षित सिंचन सुविधेंतर्गत साखळी सिमेंट बंधारे, शेततळी, पाईप पुरवठा, विद्युत किंवा इलेक्ट्रीक पंपसेट पुरवठा, सुक्ष्म सिंचन इत्यादींचा पुरवठा केला जातो. मुलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण, कोरडवाहू पिकांच्या सुधारीत वाणांची प्रात्यक्षिके व मृद तपासणी, नियंत्रित शेती अंतर्गत हरीतगृह व शेडनेट उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जाते. प्राथमिक कृषी प्रक्रीया व पणन अंतर्गत दाल मिल, भरडधान्य प्रक्रीया, संयंत्र, कृषी माल वाहतुकीसाठी वाहन खरेदी प्लॅस्टिक क्रेड इत्यादी सुविधा अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जातात. योजनेसाठी पात्र शेतकर्‍यांना देय अनुदानाची रक्कम धनादेशाद्वारे लाभधारकाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

अर्ज व अर्जाचे नमुने :
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या लाभार्थ्यांना आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागतात तेथेच अर्जाचे नमुने उपलब्ध होतात.

संपर्क व अधिक माहिती :
संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात योजनेची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.

संबंधित अधिकारी :

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ 

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १५ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १५


Sunday, November 27, 2016

कृषि यांत्रिकीकरण उपअभियान



        दिवसेंदिवस शेती क्षेत्राचा वाढत जाणारा खर्च आणि त्या तुलनेत मिळणारे उत्पादन याची ताळमेळ बसविणे शेतकर्‍यांसाठी कठीण झाले आहे. त्यामुळे कमी खर्चाची शेती ही संकल्पना पुढे आली आहे. त्यासाठी शेती क्षेत्राची यांत्रिक पद्धतीने मशागत फार आवश्यक आहे. या यांत्रिकिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे.

योजनेची स्वरूप :
राज्यातील कृषी क्षेत्रातील ऊर्जा वापर वाढविणे, प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाद्वारे शेतकर्‍यांमध्ये कृषी यांत्रिकीकरणाबाबत व काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबत जागृती निर्माण करणे, शेतकर्‍यांना कृषी यांत्रिकीकरणाच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे, कृषी औजारांच्या गुणवत्तेबाबत यंत्रणा निर्माण करणे, भाडेतत्वावर कृषी औजारांच्या पुरवठय़ासाठी केंद्रे स्थापन करणे.

लाभार्थी निवडीचे निकष :
योजनेच्या लाभासाठी लाभार्थीच्या नावे सातबारा व आठ-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. लाभार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास प्राधिकृत अधिकार्‍याचे जात वैद्यता प्रमाणपत्र आवश्यक आहे. कृषी औजारांची लेखी स्वरूपात औजाराचे ब्रँडसह मागणी करणे आवश्यक आहे. एकाच लाभार्थ्यास दोन वेळेस लाभ दिला जाणार नाही याची खात्री केली जाते. 'प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य' तत्वावर प्रवर्गनिहाय लाभार्थींची यादी तयार केली जाते. लाभार्थींची निवड जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने अंतिम करून केली जाते. सदर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते. उपलब्ध अनुदान र्मयादेत प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ देण्यात येतो.

लाभाचे स्वरूप :
योजनेंतर्गत अनुदानाचे प्रमाण केंद्र शासन ७५ टक्के व राज्य शासन २५ टक्के असे आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांस किमतीच्या ४0 टक्के व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना किंमतीच्या ५0 टक्के अनुदान देय असून सदरचे अनुदान ट्रॅक्टरच्या क्षमतेवर आधारीत अनुदान दर वेगवेगळे असल्याने ज्या गटातील औजारांची मागणी असेल त्या गटाच्या निर्धारीत उच्चतम र्मयादेपर्यंत अनुदान देय आहे. प्रकल्प उभारायचा असल्यास प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या ४0 टक्के अनुदान देय आहे. ज्या केंद्राचे प्रस्ताव दहा लाखांच्या र्मयादेत आहेत त्यांना रुपये चार लाख अनुदाय देय आहे. ज्या केंद्राचे प्रस्ताव २५ लाखांच्या र्मयादेत आहेत त्यांना रुपये दहा लाख अनुदान देय असून सदरचे प्रस्ताव बँक कर्ज प्रकरणाद्वारे सादर करणे आवश्यक आहे व कर्जाऊ रक्कमेची परतफेड करण्याचा कालावधी चार वर्षांपेक्षा कमी नसावा व सहा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ते हस्तांतरीत, विक्री, गहाण ठेवता येत नाही. योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात येते.

अर्ज व अर्जाचे नमुने :
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या लाभार्थ्यांना आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागतात तेथेच अर्जाचे नमुने उपलब्ध होतात.

संपर्क व अधिक माहिती :
संबंधीत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात योजनेची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.


ओलितासाठी सूक्ष्म सिंचन योजना


        
   
         पारंपरीक ओलिताच्या पध्दतीमुळे पाण्याचा अपव्यय होतो. शिवार पाण्याची उपलब्धता पाहता ही पध्दत चुकीची आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्यासोबतच आधुनिक साधनांद्वारे सिंचन करण्यासाठी विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सुक्ष्म सिंचन योजना राबविली जाते. योजनेंतर्गत अनुदानावर तुषार व ठिबक सिंचन संच उपलब्ध करून दिले जाते.

योजनेची व्याप्ती :
विदर्भातील अमरावती व नागपूर विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाते.

योजनेचे स्वरूप :
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे कृषी उत्पादन आणि पयार्याने शेतक?्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करणे, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत कृषी व फलोत्पादनचा विकास करण्यासाठी सुक्ष्म सिंचन पध्दती विकसीत करणे.

लाभार्थी निकडीचे निकष :
योजनेच्या लाभासाठी शेतकर्‍याच्या नावे मालकी हक्काचा सातबारा व आठ-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. सबंधित शेतकर्‍याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी. सामूहिक सिंचनाची उपलब्धता असल्यास शेतकर्‍याचे घोषणापत्र असणे आवश्यक आहे. ज्या पिकाकरीता संच बसविण्यात येणार आहे त्या पिकांची नोंद सातबारा उतार्‍यावर क्षेत्रासह असावी. विद्युत पंपाकरीता कायमस्वरूपी विद्युत जोडणी असावी. सुक्ष्म सिंचन बसवावयाच्या सर्वे नंबरचा चतुर्सिमा नकाशा सोबत असाव्या, लाभार्थी शेतकर्‍याने यापूर्वी केंद्र पुरस्कृत येाजनेंतर्गत सुक्ष्म सिंचनासाठी लाभ घेतला नसल्याचे किंवा घेतला असल्यास कोणत्या वर्षासाठी किती क्षेत्रासाठी लाभ घेतला यांचे मंडळ कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पाणी व मृद तपासणी अहवाल, यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी मागील दहा वर्षात ठिंबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे, असे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. ठिंबक व तुषार सिंचन संचाकरीता इतर कोणत्याही केंद्र व राज्य योजनेंतर्गत यापूर्वी अनुदान उपलब्ध करून घेतले असल्यास या योजनेंतर्गत त्याच संचाकरीता लाभ घेता येणार नाही.

लाभाचे स्वरूप :
सदर सुक्ष्म सिंचन योजना शंभर टक्के पुरस्कृत योजना आहे. योजनेंतर्गत ठिंबक सिंचन पध्दतीकरीता दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. अल्प, अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांना एकूण किमतीच्या ७५ टक्के किंवा रुपए ५७ हजारपयर्ंत अनुदान दिले जाते. इतर शेतकर्‍यांना एकूण किमतीच्या ५0 टक्के किंवा रूपये ३८ हजारांपर्यंत अनुदान दिले जाते. तुषार सिंचन पध्दतीकरीता दोन हेक्टर क्षेत्राकरीता एकाच संचासाठी अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी अल्प, अत्यल्प भुधारकांना एकूण किमतीच्या ७५ टक्के किंवा रुपए २२ हजार इतके अर्थसहाय्य दिले जाते. इतर शेतकर्‍यांना एकूण किमतीच्या ५0 टक्के किंवा रुपए १५ हजारांपर्यंत अनुदान दिले जाते. सन २0१४-१५ पासून अर्थसहाय्याची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात येते.

अर्ज कोठे करावा :
व्यवस्थित संपूर्ण भरलेला अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावा लागतो. याच प्रणालीवर आनलाईन अर्ज उपलब्ध आहे.

संपर्क व अधिक माहिती :
संबंधीत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात योजनेची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.

संबंधित अधिकारी :
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

Thursday, November 24, 2016

सैन्य भरती - एक गाव एक युवक मोहीम


      शेतकरी पुञांना

       रोजगारााची सुवर्ण संधी






Wednesday, November 23, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १४ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १४