Saturday, December 17, 2016

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'पोलीस उपनिरीक्षक' पदांच्या ७५० जागा


   महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस दलातील (गट-ब) (अराजपञित) पदांच्‍या एकुण ७५० जागा करीता पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा-२०१६ रविवार दिनांक १२ मार्च, २०१७ रोजी घेण्‍यात येणार असून उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्‍यात येत असुन अर्ज ऑनलाईन भरण्‍याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१६ आहे. 




डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध पदांच्या २८ जागा


     डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्‍या आस्‍थापनेवर विविध पदांच्‍या एकुण २८ जागा करीता पाञ उमेदवारांकडून मागविण्‍यात येत असुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०१७ आहे.  


  

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'कृषी सहाय्यक' पदांच्या ७० जागा



      डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्‍या आस्‍थापनेवर कृषी सहाय्यक पदांच्‍या एकुण ७० जागा करीता पाञ उमेदवारांकडून मागविण्‍यात येत असुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१७ आहे.  



  

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत-राज्‍य सेवा पुर्व परीक्षा २०१७




       महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्‍यशासनाच्‍या आस्‍थापनेवर विविध पदांच्‍या एकुण १५५ जागा करीता राज्‍य सेवा पुर्व परीक्षा २०१७ रविवार दिनांक २ एप्रिल, २०१७ रोजी घेण्‍यात येणार असून उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्‍यात येत असुन अर्ज ऑनलाईन भरण्‍याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०१७ आहे.   




Thursday, December 15, 2016

मुद्रा बँक योजना


प्रस्तावना
देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी  २०,००० करोड रुपये भांडवल असलेली मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सीअर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले.
या बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. या बँकेच्या मध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल. शिवाय या कर्ज योजनांच्या नियमनाचं कामही मुद्रा बँकेच्या हाती असेल.

मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार
मुद्रा योजनेत खालील तीन श्रेणीचा समावेश आहे:
  • शिशू : शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं
  • किशोर : किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाते
  • तरुण श्रेणी : तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल


थोडक्यात मुद्रा बँक योजना
मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याच बरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल.
पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाते. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक हि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.. कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराला मुद्रा कार्डदिले जाते जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

मुद्रा योजनेची वैशिष्टय़े
  • देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य
  • वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा
  • २०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ
  • सिडबीची ही उपकंपनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीत येणार
  • सूक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक


मुद्रा लोन साठी आवश्यक बाबी
  • कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.
  • कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे नाही
  • स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही.
  • हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
  • वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत
  • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.


मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • ओळखीचा पुरावा मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.
  • रहिवासी पुरावा उदा लाईट बिल, घर पावती.
  • आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
  • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
  • आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.
  • अर्जदाराचे 2 फोटो.


स्‍ञोत – विकासपीडिया


Tuesday, December 13, 2016

बीज भांंडवल योजना


अभियानाचे चेतना दुत-रमेश शेंडे यांनी ठेवला समाजासमोर आदर्श


अभियानास ५० हजारांची मदतः जिल्‍हाधिकारी सिंह यांनी केला सन्‍मान 
कुटुंबातील वडील व पत्‍नी कर्करोगाने गमावले. अशी स्थिती जिल्‍हयातील इतर शेतक-यांवर येऊ नये. त्‍यांचा वेळीच उपचार व्‍हावा. यासाठी आपल्‍याकडूनही फुल ना फुलाची पाकळी म्‍हणून रमेश मारोतराव शेंडे यांनी पत्‍नीच्‍या तेरवीला लागणा-या खर्चाची ५० हजार रूपयांची रक्‍कम पत्‍नी विजया शेंडे हिच्‍या जन्‍म दिवशी बळीराजा चेतना अभियान समितीस प्रदान करून समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवले.गुरूवार दि. ८ डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍याकडे ५० हजार रूपयांचा धनादेश त्‍यांनी सूपुर्त केला. यावेळीपरविक्षाधीन जिल्‍हाधिकारी दीपक मीणा, अपर जिल्‍हाधिकारी लक्ष्‍मण राऊत, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले जिल्‍हाधिकारी यांनी बळीराजा चेतना अभियानाचे स्‍मृती चिन्‍ह देऊन त्‍यांचा सन्‍मानही केला.
      यवतमाळ शहरातील देवानंद नगरातील रहिवासी सेवा निवृत्‍त सहायक निबंधक(सहकारी संस्‍था ) रमेश मारोतराव शेंडे यांची पत्‍नी विजया यांचे ५ ऑगस्‍ट २०१६ रोजी कर्करोगाने निधन झाले. यावेळी त्‍यांनी तेरवीचा कार्यक्रम न करता याचा खर्च सामाजिक कार्यात खर्च करावा असा त्‍यांचा मनोदय होता. अशातच बळीराजा चेतना अभियान समितीकडून जिल्‍हयातील कर्क रोगग्रस्‍त शेतक-यांना मदत वितरीत करीत असल्‍याची माहिती त्‍यांना मिळाली.  त्‍यामुळे रमेश शेंडे यांनी तेरवी कार्यक्रम न करता यावर होणारा ५० हजार रूपयांचा खर्च हा कर्करोग ग्रस्‍तांच्‍या उपचाराच्‍या मदतीसाठी देण्‍याचे ठरविले. ८ डिसेंबर रोजी त्‍यांची जीवनसंगीनी विजया यांचा जन्‍म दिवस असल्‍याने या दिवसाचे औचित्‍य  साधून ही रक्‍कम जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांना सुपूर्त करून समाजासमोर एक आदर्शच उभा केला.

अवास्‍तव खर्च टाळून मदत करावी
समाजातील अनेक नागरिक विवाह, वाढदिवस, तेरवीअशा विविध क्षणिक सुखाच्‍या कार्यक्रमावर अवास्‍तव केला जातो. मात्र, हा खर्च जिल्‍हयातील गरजवंत, निकडवंत शेतक-यांच्‍या उपचारासाठी, त्‍यांच्‍या पाल्‍यांच्‍या शिक्षणसाठी दिल्‍यास समाज आपल्‍या पाठीशी उभा असल्‍याची भावणा निर्माण होईल. यातून एक प्रकारे सामाजिक बांधीलकी जोपसता येईल. त्‍यामुळे समाजातील अशा दानशूर व्‍यक्‍तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

समाजातील नागरिकांनी पुढे यावे
जिल्‍हयातील शेतकरी संकटात सापडला असताना जिल्‍हयातील दानशूर नागरिकांनी पुढे येऊन शेतक-यांचे मनोधैर्य वाढविले पाहिजे, त्‍यांना मदत केली पाहिजे. आल्‍याकडील  कौटुबिंक कार्यक्रमावर अवास्‍तव खर्च न करता मदत केली पाहिजे.

रमेश मारोतराव शेंडे, यवतमाळ