Monday, November 7, 2016

योजना - कापूस विकास कार्यक्रम



अन्न धान्यासोबतच व्यापारी व नगदी पिकाचे क्षेत्र वाढविणे, या पिकासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (व्यापारी पिके) अंतर्गत कापूस विकास कार्यक्रम राबविला जातो. या पिकासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासोबतच या पिकाखालील क्षेत्र वाढविणे त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आदी उपक्रम या योजनेंतर्गत घेतले जातात.

योजनेची व्याप्ती : १२ व्या पंचवार्षिक योजनेत अन्न धान्याच्या गरजेसोबत नगदी पिकाची गरज भागविण्यासाठी कापूस पिकाअंतर्गत अन्नधान्य पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे. या अंतर्गत आंतरपीक पद्धतीस प्रोत्साहन देणे तसेच अतिघन लागवडीची प्रात्यक्षिक आयोजित करणे, कडधान्य पिकाच्या क्षेत्र विस्तार व सुधारित तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढविण्याच्या उद्दिष्टाने जिल्ह्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी उत्पादकता असलेल्या तालुक्यामध्ये कार्यक्रम राबविणे, तालुक्यातील प्रकल्प क्षेत्र निवड करून त्या तालुक्यातील सर्वात कमी उत्पादकता असलेल्या मंडळाची निवड करणे, त्यात गावाची व प्रकल्प क्षेत्राची निवड करून प्रकल्प क्षेत्राची निवड करून प्रकल्प राबविणे आदी कार्यक्रम या योजनेंतर्गत घेतले जातात.

लाभार्थी निवडीचे निकष, नियम, अटी : प्रकल्प क्षेत्रातील नोंदणीकृत शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांची निवड ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली जाते. लाभार्थीची निवड ग्रामपंचायतीच्या सहभागाने व समन्वयाने करावी लागते. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक, अपंग शेतकर्‍यांची प्राधान्याने निवड करण्यात येते. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त 0.0 हेक्टरपर्यंत लाभ दिला जातो.

योजनेचे स्वरूप : कापूस पिकात तूर, उडीद, मूग यासारख्या अन्नधान्याच्या आंतरपिकास प्रोत्साहन देणे. कापूस पिकात एकात्मिक किड व्यवस्थापन, कापसाच्या देशी वाणाची अतिघन लागवड, अधिक लांब धाग्याच्या कापसाची प्रात्यक्षिके आयोजित करून कापूस उत्पादनास चालना देणे हा योजनेचा उद्देश आहे.

लाभाचे स्वरूप : प्रात्यक्षिकासाठी बियाणे व निविष्ठा किट कृषी खात्याच्या मार्गदर्शक सूचनेनुसार (प्रकल्प आधारित) उपलब्ध करून दिले जाते. एकात्मिक किड व्यवस्थापना अंतर्गत किटनाशकांच्या पुरवठा केला जातो.

अर्ज व अर्जाचे नमुने : संबंधित शेतकरी लाभार्थ्यास योजनेच्या लाभासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. तेथेच अर्जाचे नमुने मिळतात.

संपर्क व अधिक माहिती : संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात योजनेची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.


संबंधित अधिकारी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ 

अनुभवी व अभ्यासू नागरिकांना आवाहन-शेतकर्‍यांसाठी योजना बनविण्याची संधी




जिल्हयात बळीराजा चेतना अभियानांतर्गत विविध योजना व उपक्रम शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू नागरिकांना शेतकर्‍यांसाठी योजना तयार करण्याची संधी या अभियानातून उपलब्ध झाली आहे. या योजनांचे प्रारूप तथ माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आणि शेतकरी उपयोगी उपक्रमांसाठी ग्रामस्तरीय समित्यांना एक लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. यातून गावातील अनेक गरजू शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत वितरीत होत आहे. अशाच प्रकारची मदत योजनेच्या माध्यमातून मिळावी, यासाठी विविध xयोजना आखण्याचे काम अभियानातून सुरू आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू लोकांच्या दृष्टीकोणातून शेतकरी व शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावेल या हेतूने नाविन्यपूर्ण योजनांचे प्रारूप मागविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील भू-भाग व जलविषयक परिस्थितीचा अभ्यास करून शेतकर्‍यांनी पिकांनुसार जल व्यवस्थापन कसे करावे, पारंपरिक कौशल्य व व्यवसायविषयक वृद्धी करणे, शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शैक्षणिक विकास तथा विविध व्यावसायिक कौशल्यवृद्धी प्रशिक्षण, शेतमालावरील प्रक्रिया उद्योग, शेतमालासाठी बाजारपेठ व विपणन व्यवस्थापनाबाबत नियोजन करणे, शेती कसण्याचे नाविन्यपूर्ण तंत्र, विविध धान्य व शेतीमालाची प्रतवारी करण्याचे तंत्र व हंगामानुसार नियोजन करणे, विविध जोडधंदे उभारणे आदि विषयावर योजना तयार करण्यात येणार आहे.

योजना वस्तुनिष्ठ व प्रत्यक्षपणे करण्याजोगी असावी. तसेच सादर करण्यात येणारे नियोजन, योजना ही कमी खर्चाची, किफायतशीर असावी. जेणेकरून शेतकर्‍यांना सद्य:परिस्थितीत त्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल. तसेच योजना सुलभ व फायदेशीर ठरेल अशी असावी, शेतकर्‍यांची सकारात्मक मानसिकता तयार होईल अशा यशोगाथा व माहितीपूर्ण लेख यामध्ये असावे. यासाठी संबंधित नागरिकांनी योजनेचे नाव व स्वरूप, योजनेत शेतकर्‍याने करावयाची अपेक्षित कार्यवाही, अपेक्षित लाभ याची परिपूर्ण माहिती देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Thursday, November 3, 2016

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक, गट-ब पदांच्‍या एकुण १८१ जागा

  

      महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्‍यशासनाच्‍या विक्रीकर निरीक्षक, गट-ब (अराजपञित) पदांच्‍या एकुण १८१ जागा करीता विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा-२०१६ रविवार दिनांक २९ जानेवारी, २०१७ रोजी घेण्‍यात येणार असून उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्‍यात येत असुन अर्ज ऑनलाईन भरण्‍याची शेवटची तारीख २३ नोव्‍हेंबर २०१६ आहे.      


Tuesday, November 1, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ९ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ९


Thursday, October 27, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ८ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ८



Tuesday, October 25, 2016

शेतकरी यशोगाथा (शेतकरी - देवराव ठावरी)


आधुनिक शेतीची कास धरलीशेतात प्रगती साधली





रीप हंगामावर शेतक-याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. यातच शेतीवरील खर्च ही सर्वात मोठी बाब आज बनली आहे. अशाही स्थितीत उत्‍तम नियोजन, इच्‍छाशक्‍ती असल्‍यास सर्व काही शक्‍य होते....असाच अनुभव आहे तो मारेगाव तालुक्‍यातील केगाव येथील देवराव सखाराम ठावरी यांचा. परीसरातील बाजारपेठांचा अभ्‍यास करून वर्षातील तीनही हंगामात पिकांची लागवड करून ग्राहकांपुडे विविधता ठेवणे, स्‍वतःहा मालाची विक्री करणे आदि वैशिष्‍टयांमुळे शेतीमध्‍ये आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपरिक शेतीला बगल देत सर्व कुटुंबाच्‍या मदतीने नियंत्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. यातून शेती फायदेशिर व शाश्‍वत होऊ लागली. शेतीचे तंत्र अधिकाअधिक जमजावून घेतल्‍याने अनावश्‍यक खर्च टाळता येऊन शेतीचा विकास घडवून आणता आला. नुकतीच जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी त्‍यांच्‍या शेतीला भेट दिली.


................................................................................................
मारेगाव तालुक्‍याच्‍या ठिकाणावरून ५ किलोमीटरवर अंतरावर आदिवासी बहुल हजार लोकसंख्‍येच  केगाव हे छोटसं गाव. १० पर्यत शिक्षण घेतलेले देवराव ठावरी यांच्‍याकडे वडीलोपा‍र्जीत ८ एकर शेती. पूर्वापारपासून कापूस, सोयाबीन, तूर या पारंपारिक पिकांची लागवड करीत. कधी नैसर्गिक आपत्‍तीत पिकांचे नुकसान तर कधी कोरडया दुष्‍कामुळे पिकांचे कोवळे अंकुर करपायचे. ना नफा ना तोटा लावलेला खर्च तेवढा या शेतीतून निघायचा. पत्‍नी, तीन मुले, सुना यांची साथ मिळाली. पुणे जिल्‍हयातील तळेगावा दाभाडे येथील काढणी पश्‍चात तंत्रज्ञान केंद्रात प्रशिक्षणात सहभाग घेतला. यातून बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा, हवामानाचा, बाजारापेठेचा अभ्‍यास करून  शेतीचे नियोजन केल्‍यास शेती फायद्यायाची ठरू शकते हे त्‍यांनी हेरले यातूनच शेतीत विविध प्रयोग राबविण्‍यास सुरवात झाली.  
............................................................................................
संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली
जमीन मध्‍यम स्‍वरूपाची असून चढ उताराची होती. शेतात विहिरीची सुविधा असूनही पाणी देण्‍यास मोठी अडचण यायची. यातून केवळ दोन एकर क्षेत्रच हंगामी ओलीताखाली यायची. यातून पाणी असूनही पीके घेण्‍यास अडचण याचची. त्‍यामुळे संपूर्ण शेतीचे सपाटीकरण करून शेती समतल केली. कृषी विभागाच्‍या विविध प्रशिक्षण कार्यशाळेतून ज्ञान आत्‍मसात करून संपूर्ण शेती ओलीता खाली आणण्‍याचे ठरविले. पुढे विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत वडीलोपार्जित ८ एकर शेती सुरवातली ठिबक सिंचनाखाली आणली. यात फुलकोबी, टमाटर, काकडी, पालक मेथी, तर दोन एकर क्षेत्रावर सायोबीन व रब्‍बीत हरभरा, उन्‍हाळी भूईमुंग हे पीके ठिबक सिंनाखाली घेतात.
.................................................................
पारंपरिक पिकांना तिलाजंली
आठ एकर शेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड पारंपरिक पध्‍दतीने खरीप हंगामात करायचे. मात्र, निर्सगाच्‍या लहरीपणामुळे जेमतेम उत्‍पन्‍न पदरी पडायचे. संयुक्‍त  कुटुंब असल्‍याने कुटुंबाचा गाडा चालविणे म्‍हणजे तारेवरची कसरत व्‍हायची. यातून पिक पध्‍दतीत बदल केल्‍यास विस्‍कटलेली आर्थिक घडी बसू शकते. असा कुटुंबातील सर्वानिच निर्यण घेतला आणि आज तो प्रत्‍यक्षात आणला. शेडनेट, ठिबक, पॉलि मल्‍चिंग ( प्‍लास्‍टीक आच्‍छादन) करून भाजीपाला पिके घेण्‍याचे ठरविले. यातून दररोज उत्‍पन्‍न हातात येऊ लागले.
...................................................................................
कुटुंबच रंगतोय शेतीवर
कुटुंब प्रमुख वडील देवराव ठावरी आजपर्यंत शेतीत राबत होते. मात्र, आता याला जोड मिळाली मोठा मुलगा राहुल, मधवा प्रफुल आणि लहान अतुल या तिघांची. पत्‍नी छबूबाई, सुन मनिषा, सुनंदा हे सर्वजन शेतावर राहत असून शेतीत काम करीत आहे. शेती उत्‍तम व्‍हावी, त्‍यातून भरघोस उत्‍पन्‍न निघावे यासाठी असर्व कुटुंब झटत आहे. कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍य नियोजन करून आपली जबाबदी पार पाडतात. कुठल्‍या दिवशी शेतामध्‍ये काय काम करावे याचे नियोजन वडील, मुले, पत्‍नीने ठरवितात. बाजारपेठ, वाहतूक, माल काढणी अशी शेतातील 60 टक्‍के कामे घरातील सदस्‍य करीत असून 40 टक्‍के कामे मजूराकरवी करून घेण्‍यात येतात.
.........................................................................
अर्ध्‍या एकरावर शेडनेट
आपल्‍या जवळ असलेल्‍या 7 एकरावरील शेतामधील अर्धा एकर जागेवर कृषी विभागाच्‍या सहाकार्याने शेडनेटची उभारणी केली. यामध्‍ये पहिल्‍याच हंगामात शेडनेटमध्‍ये काकडी व पालक, मेथी लागवडीतून तर उर्वरित क्षेत्रावर मल्‍चींग आच्‍छादनाचा वापर करून टमाटर व फुलकोबी  या भाजीपाला पिकांची लागवड केली. यातून एक लाख १ लाख ४०  हजार रूपयांचे उत्‍पन्‍न हाती आले. त्‍यामुळे शेडनेट व मल्‍चींग पध्‍दतीने लागवड केलेल्‍या शेतीत पाण्‍याचा अपव्‍यय टाळता आला आणि उत्‍पादनही  घेता आले.
..................................................................................
आधुनिक अवजारांचा वापर
शेतातील उत्‍पन्‍नावर सुधारणा होत असताना आता शेतीत आधुनिक यंत्राचा वापर  करण्‍याकडे कुटुंबाचा कल वाढला. यातून ट्रक्‍टर, पेरणीयंत्र, रोटाव्‍हेटर, पंजी, बीबीएफयंत्र, दोनफाळी नांगर आणि इतर यंत्र खरेदी करण्‍यात आली. स्‍वतःहाच ही सर्व यंत्रे तीनही भाऊ चालवित असल्‍याने शेत मशागतीचे काम हलके होऊन शेतमजूरांचा अनाठायी खर्च वाचू लागला. इतकेच नव्‍हेतर ही यंत्रे इतर शेतक-यांना किरायाने देत असून यातून शेतीला जोडधंदाही लाभला आहे.
.......................................................................................
मे महिन्‍यापासून लागवडीचे नियोजन
कोबी, टमाटर, काकडी, मेथी,  पालक यासारखे भाजीपाले पिकांचे रोप व लागवडीचे  नियोजन मे महिन्‍यापासून करण्‍यात येते. याकाळात भाजीपाला उत्‍पादन मंदावत असल्‍याने पिकांना चांगला दरही मिळतो. तर कोबी आणि काकडी मल्‍चींग पध्‍दतीवर शेटनेटमध्‍ये लागवड करण्‍यात येत असलून सनासुधींच्‍या हंगामात भाजीपाला पिकांची मागणी वाढते. अशाच प्रकारचे नियोजन पावसाठी व हिव्‍हाळी हंगामात करीत असल्‍याने बाराही महिने भाजीपाला पिकांना चांगली मागणी असते.  
...........................................................................
परीसरातील बाजारापेठेत विक्री
मारेगावपासून वणी, भद्रावती, करंजी, पांढरकवडा, मारेगाव कुंभा या ठिकाणी बाजार भरत असल्‍याने याठिकाणी स्‍वतःहा भाजीपाल्‍याची विक्रीचे दुकान लावतात. यातून खर्च वजा जाता चांगला नफाही  मिळत आहे. तीनही भावंडे आदल्‍या दिवशी मालाची काढणी काढणीपासून तर विक्रीपर्यंतचे काम करतात.
जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची शेताला भेट
देवराव ठावरी यांच्‍या शेतीला जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी भेट देऊन त्‍यांच्‍या शेतीची पाहणी केली. शेतामध्‍ये राबवित असलेल्‍या विविध नाविण्‍यपूर्ण प्रयोगांची माहिती घेतली. शेडनेट मधील पीके, यातून निघणारे उत्‍पादन, बाजारपेठ, विक्रीतंत्र, वाहतून शेतीत बदल कसा घडविला, आंतरपिके, भाजीपाला, लागवड तंत्र आदिंची माहिती जाणून घेतली. जिल्‍हयातील अशा प्रगतिशील शेतक-यांची माहिती जिल्‍हयातीलच इतर शेतक-यांपर्यत पोहचली पाहिजे. जेणेकरून इतर शेतक-यांनी त्‍यांचा आदर्श घेऊन अशा पिकांकडे वळेल आणि शेतक-यांची आर्थिक समृध्‍दी येईल.
.............................................................................       
पिक बदलामुळेच प्रगती
पांरपरिक पिके घेताना निर्सगाचा लहरीपणा आणि शेतातून मोजकेच उत्‍पन्‍न पदरी पडत होते. मात्र, आता पिकांत बदल आणि शेडनेटमुळे शेतातून उत्‍पन्‍न निघत आहे. याला कुटुंबातील मुलांची साथ मोलाची ठरली. तसेच तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांची वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.   
देवराव ठावरी, शेतकरी, केगाव
.............................................................................
पुरक व्‍यवसायाकडे वळावे  
जिल्‍हयातील शेतक-यांनी पारंपरिक पिकासोबत पाण्‍याची व्‍यवस्‍था असलयास फळबाग, भाजीपाला, फुलशेती पिकांकडे वळले पाहिजे. मुख्‍य पिकांत आंतरपिकांची लागवड करावी, शेतीसोबत दुग्‍धव्‍यवसाय, शेळीपालन, कुक्‍कुटपालन अशा पुरक व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतीत प्रगती साधता येते. 
दत्‍तात्रेय गायकवाड , जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी
..............................................................................
अभियानाची जनजागृती करणार
शेतामध्‍ये राबविण्‍यात आलेले नाविण्‍यपूर्ण प्रयोगामुळे शेतीत प्रगती साधता आली. त्‍यामुळे इतर शेतक-यांनाही कमि खर्चात, शेतीचे नियोजन, लागवड तंत्रज्ञान, बाजारपेठांचा अभ्‍यास आदि विषयांचे मार्गदर्शन इतर शेतक-यांना बळीराजा चेतना अभियान अंतर्गत करणार आहे. 

...........................................................................................

शब्‍दांकन ः नीलेश फाळके, बळीराजा चेतना अभियान,  जिल्‍हाधिकारी कार्यालय,  यवतमाळ
मोबाईल नंबर ः ९९२२९२०६५६
देवराव ठावरी, शेतकरी, केगावता. मारेगाव जि. यवतमाळ
मो. नं. ९६०४३६८१८२

.......................................................................

Sunday, October 23, 2016

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ७ व्हिडीओ मार्गदर्शन

झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) 
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ७